Justice ShriRam Modak Dainik Gomantak
गोवा

Goa News : अर्थ कसा लावता यावर कायद्याचे यश अवलंबून : न्या. श्रीराम मोडक

Goa News : कारे कायदा महाविद्यालयात द क्रोनिकल ई वृत्तपत्राचे अनावरण

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

सासष्टी, १ जुलै २०२४ पासून भारतीय साक्ष अधिनियम २०२३ हा नवीन कायदा लागू होणार आहे. हा कायदा कित्येक वर्षापासून सुरु असलेल्या भारतीय साक्षी पुरावा अधिनियम कायद्याची जागा घेणार आहे.

हा नवीन कायदा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांचे प्रयत्न व सहकार्य आवश्यक आहे. कुठल्याही कायद्याचा अर्थ कसा लावता त्यावर त्या कायद्याचे यश अवलंबून असते, असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्रीराम मधुसूदन मोडक यांनी सांगितले.

मडगावच्या जी. आर. कारे कायदा महाविद्यालयात आयोजित "भारतीय साक्ष अधिनियम २०२३ कायद्याचे विस्तृत पैलू" या विषयावर आयोजित व्याख्यान मालेत ते बोलत होते.

याप्रसंगी त्यांनी जी. आर. कारे कायदा महाविद्यालयाच्या कार्याचा गौरव केला. या महाविद्यालयातर्फे विविध विषयांवर ज्ञानार्जन केले जाते ही चांगली गोष्ट आहे. गोव्यातील शिक्षण संस्था देशात व जगात काय घडत आहे याची दखल घेत आहे ही सुद्धा चांगली बाब आहे, असेही त्यांनी म्हटले.

याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष नितीन कुंकळ्ळीकर, अॅड. प्रीतम मोराईश, अॅड. प्रसाद नाईक, कायदा महाविद्यालयाच्या विभागीय प्रमुख श्रुती नाडकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.

४० महिला वकिलांचा सत्कार

द क्रोनिकल या महाविद्यालयाच्या ई वृत्तपत्राचे अनावरण यावेळी करण्यात आले. द क्रोनिकल हे ई वृत्तपत्र प्राचार्य डॉ. मारिया गोरेटी सिमोईश यांनी संपादित केले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या उपलब्धीबद्दल माहिती देण्यात येते. व्याख्यानानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी दक्षिण गोव्यातील ४० महिला वकिलांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT