Goa Politics: काँग्रेसच्या पक्षांतर्गत बैठका पार, प्रशिक्षण व जबाबदारी निश्‍चित

Goa Politics: प्रभारी ठाकरे दिल्लीकडे: एका दिवसाचा दौरा आटोपला
Goa congress
Goa congressDainik Gomanatk
Published on
Updated on

Goa Politics:

काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे शुक्रवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाल्यानंतर शनिवारी पक्षांतर्गत सर्व विभागीय नेत्यांच्या, त्याचबरोबर इंडिया आघाडीतील काही नेत्यांच्या बैठका घेतल्या. त्याशिवाय महिला आघाडीच्या अनुषंगाने त्यांनी गंभीरपणे चर्चा केल्याची माहिती हाती आली आहे.

सकाळी ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यासह आझाद मैदानावर सुरू असलेल्या राजकीय आरक्षणाच्या एसटी समाजाच्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आरक्षणाचा विषय समजून घेतला. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले. पक्षाच्या कार्यालयात दुपारी इंडिया आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्यांच्या भेटीही घेतल्या.

Goa congress
Kadamba Employees: कदंबच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर स्थगित

त्याशिवाय प्रदेश महिला आघाडीच्या कामावरही त्यांनी अध्यक्षा बिना नाईक यांच्याशी चर्चा केली. ठाकरे यांच्या दौऱ्यापासून अजूनही गिरीश चोडणकर यांच्या गटाचे कार्यकर्ते किनारा करून असल्याचे दिसून आले. उत्तर गोव्याच्या उमेदवारीसाठी शर्यतीत असलेले काही नेते आवर्जून ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते.

Goa congress
Goa Politics: दक्षिणेतील उमेदवारीचा निर्णय दोन दिवसांत

उमेदवार निवडीवर चर्चा नाही

एक दिवसाच्या या दौऱ्यात उमेदवार निवडीच्या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही. केंद्रीय निवडणूक समिती त्यावर निर्णय घेणार असल्याने आता त्यांच्या गोटात तो विषय आहे. छाननी समितीने दिलेल्या नावापैकी दोन नावे लवकरच जाहीर होतील, अशी आशा पक्षाला आहे. परंतु ठाकरे यांनी अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत.

तेलंगणाप्रमाणे गोव्यात डावपेच?

तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार आणण्यासाठी त्यांनी जे डावपेच आखले होते, त्यात त्यांना यश आले. सध्या पक्षातील नेत्यांच्या भूमिका आणि त्यांची निवडणुकीकडे पाहण्याची वृत्ती, समज याचा ते आढावा घेत असल्याचे स्पष्ट दिसून आले. दिवसभराच्या कामकाजाच्या अनुषंगाने निवडणुकीत कोणाकडे कोणती जबाबदारी द्यायची, यावरही त्यांनी मते जाणून घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com