Sanquelim Congress Dainik Gomantak
गोवा

साखळीत कॉंग्रेसची ताकद वाढली, बेरोजगार युवक सज्ज

गोव्यात भाजप सरकारने महत्वाचा खाण उद्योग बंद करुन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अडीज लाख लोकांची रोजीरोटी बंद केली; कॉंग्रेस

दैनिक गोमन्तक

साखळी : भाजपने नवीन उद्योग सुरु करण्याच्या आश्वासनाला हरताळ फासून असलेले उद्योगच बंद केले व बेरोजगारी अधिक वाढवली. मोदी सरकारने देशात दरवर्षी दोन कोटी नवीन उद्योग सुरु करण्याची हमी दिली होती, पण प्रत्यक्षात गेल्या आठ वर्षात देशातील पंचवीस कोटी उद्योग बंद केले. गोव्यात भाजप सरकारने महत्वाचा खाण उद्योग बंद करुन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अडीज लाख लोकांची रोजीरोटी बंद केली. माजी मुख्यमंत्री स्व. पर्रीकर यांनी बंद केलेला खाण (Mining) व्यवसाय दहा वर्षे पुन्हा सुरु करता आला नाही.

म्हणूनच बेरोजगारी व बेकारीची झळ सोसलेल्या युवा वर्गात भाजपाबद्दल तीव्र संतापाची लाट पसरली असून मोठ्या प्रमाणात युवक कॉंग्रेसकडे वळत आहेत. कुठल्याही परिस्थितीत भाजपला (BJP) सत्ताभ्रष्ट करुन कॉंग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. असे उदगार कर्नाटकचे आमदार (MLA) आर.व्ही.देशपांडे यांनी काढले.

साखळी (Sanquelim) मतदारसंघातील सुमारे दिडशे युवकांनी कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केला असून कॉंग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कॉंग्रेस उमेदवार सगलानी यांच्या प्रचारार्थ साखळी गट युवक कॉंग्रेसतर्फे न्हावेली-साखळी येथील विविधा सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना कर्नाटकाचे आमदार देशपांडे बोलत होते. यावेळी कॉंग्रेस प्रभारी रवी भोसराज, माजी आमदार प्रताप गावस, साखळीचे उपनगराध्यक्ष राजेश सावळ, प्रदेश युवा कॉग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, सचिव साईश आमोणकर, साखळी गट कॉंग्रेसचे अध्यक्ष मंगलदास नाईक, साखळी गट युवा कॉंग्रेस अध्यक्ष रियाज सय्यद, सरचिटणीस संदीप नाईक, रमेश सिनारी, अंकुश कामत आदींची उपस्थिती होती.

कॉंग्रेसनेच नेहमी युवकांची काळजी घेतली

भाजपने फक्त युवकांचा सत्तेसाठी व स्वार्थासाठी वापर केला. कॉंग्रेसनेच नेहमी युवकांची काळजी घेतली. त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. मतदानाचे वय पंचवीस वरुन अठरा हे कॉग्रेस सरकारच्या काळात स्व.राजीव गांधी यांनीच केले. देशाला स्वातंत्र्य कॉंग्रेसने मिळवून दिले. गोव्याला मुक्ती कॉंग्रेसनेच मिळवून दिली. गोवा सज्जन व प्रेमळ लोकांचे राज्य. गोव्यात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात भेदभाव कधीच करीत नाहीत.

भाजप सरकारने धर्मात व जातीत भांडणे लाऊन आपली सत्तेची पोळी भाजून घेतली. गोव्याचा व साखळीचा खरा विकास प्रतापसिंह राणे यांनी कॉंग्रेस सरकार (Government) सहाय्याने केला. भाजपच्या काळात केवळ भ्रष्टाचार, बेरोजगारी व गुन्हेगारी वाढली. प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकार हे गुन्हेगारांना पाठिशी घालणारे व सर्वात भ्रष्ट सरकार आहे असा घरचा आहेर भाजपच्याच राज्यपालांनी दिला आहे. असे देशपांडे म्हणाले.

कॉंग्रेस प्रभारी रवी भोसराज म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या (cm) मतदार संघात राहुल गांधीचे येण्याने मुख्यमंत्री हरत आहेत हे सिध्द झाले. भाजपचे सरकार जाऊन कॉंग्रेस सरकार पुन्हा सत्तेवर येत आहे. सत्तेवर आल्यानंतर पहिली बैठक खाण विषयक घेऊन कायदेशीर खाण व्यवसाय पुन्हा सुरु करणार. भाजपने भरपूर भ्रष्टाचार करुन कमविलेले पैशे जनतेला वाटणार आहेत. जनतेने भाजपचे नोट घ्यावे व वोट मात्र कॉंग्रेसला द्यावे असे आवाहन रवी यांनी केली.

माजी आमदार प्रताप गावस म्हणाले जेव्हा आम्ही सर्वजण कॉंग्रेस (Congress) प्रचारासाठी फिरत होतो त्यावेळी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी एकजूट राहणार हे आश्वासन दिले होते. ते आता पाळले आहे. आमच्या प्रचाराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कॉंग्रेसचा विजय निश्चित आहे.

प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात युवक बाहेर येऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढा उभारत आहेत.भाजपने सरकारी नोकरी घोटाळा करुन नोकऱ्या विकुन असंख्य युवकांना फसवले. बेकारी भत्ता, 50 हजार नोकऱ्या, 10 हजार सरकारी नोकऱ्या अशी डोळ्यात धुळफेक केली. आणि आता 30 हजार खाजगी नोकऱ्याचे खोटे आश्वासन दिले जात आहे. भाजपने गोवा विकायला काढला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडलीआहे.हे खोटारडे सरकार उलथवून टाका. साखळी गट कॉंग्रेस अध्यक्ष मंगलदास नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या सभेला उपस्थित सुमारे दिडशे युवकांनी यावेळी कॉंग्रेस ला पाठिंबा व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT