Canacona municipal market Dainik Gomantak
गोवा

काणकोण पालिका मार्केट भोवती दुर्गंधीचे साम्राज्य

नागरिकांचे आरोग्य धोक्यात; विक्रीसाठीचा भाजीपाला ठरु शकतो अपायकारक

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण पालिकेच्या भाजी मार्केट सभोवती कचरा साचला असून गटारातील कचरा कुजून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. येथील कचऱ्यावर गुरे ताव मारताना दिसत आहेत. याचा परिणाम या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो तसेच. विक्रीसाठीचा भाजीपाला अपायकारक ठरु शकतो. त्यामूळे पालिकेने याकडे गांभिर्याने पाहणे आवश्यक आहे. (The stench reigns around the canacona municipal market )

पालिककडे कचरा उचल करण्यासाठी स्वच्छता कामगार आहेत. शिवाय कचरावाहू वाहनेही आहेत. मात्र, भाजी मार्केटमधील कचऱ्याची उचल होत नाही. अनेक वर्षाचा प्लास्टिक व अन्य कचरा शेजारच्या शेतामध्ये साचला आहे. खुल्या मार्केटमधून वाहणाऱ्या दोन गटारांमध्ये प्लास्टिक व अन्य कचरा कुजून मासळी व चिकन-मटन मार्केटमधील पाणी साचले आहे. त्यामुळे येथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. कचऱ्यामुळे ही गटारे तुंबली आहेत.

ही गटारे पालिकेने स्वच्छ करावीत, अशी मागणी नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी केली असून ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. पालिका वर्षाकाठी किमान 81 लाख रुपये घरोघर कचरा उचल करण्यासाठी कंत्राटदाराला देते. मात्र पालिका मार्केट कचरामुक्त करण्यास दिरंगाई करते, अशी खंत नाईक गावकर यांनी व्यकत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT