पणजी: गोवा क्षत्रिय मराठा (तारुकर) समाजातर्फे पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात साजऱ्या होणाऱ्या श्रावणमास अखंड भजनी सप्ताहाच्या ‘पारा’निमित्त 26 वी अखिल गोवा भजनी स्पर्धा 2 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता महालक्ष्मी देवालय पणजी येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत 13 भजनी पथकांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख 22 जुलै आहे. (Bhajan competition at Panaji on 2nd August by Goa Kshatriya Maratha Samaj )
यात पुरूष गटात आठ व समाजातर्फे एक आरक्षित पथक, महिला गटात 4 मिळून एकूण 13 भजनी पथकांचा समावेश असणार आहे. पुरुष गटात प्रथम पारितोषिक 15,001 रु. व राजदीप बिल्डर्स पुरस्कृत चांदीचा फिरता चषक, द्वितीय पारितोषिक 10,001 रु. व तृतीय पारितोषिक 7,001 रु. व उत्तेजनार्थ सहा पथकांना अनुक्रमे 2,001 रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
महिला गटासाठी प्रथम पारितोषिक 7,001 रु. व ॲड. मीरा निवृत्ती मेढेकर पुरस्कृत फिरता चषक, द्वितीय पारितोषिक 5,001 रु., तृतीय 3,001 रु. व उत्तेजनार्थ 2,001 रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. त्याशिवाय उत्कृष्ट गायक, पखवाजवादक, हार्मोनियमवादक आणि गवळण गायक यांना प्रत्येकी 2,001 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत.
दरम्यान, सकाळच्या सत्रात 9 ते दु. 3 वाजेपर्यंत वारकरी दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी इच्छुक दिंडी पथक प्रमुखाने 23 जुलैपर्यंत नोंदणी करावी. तसेच 2019 च्या भजनी स्पर्धेत पुरूष व महिला गटातील प्रथम विजेत्या पथकास थेट प्रवेश दिला जाईल; मात्र त्यांना प्रवेश पत्रिका नेणे आवश्यक आहे, असे कळवण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.