Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: 'म्हादई'बाबतचे मौन हा गोव्यातील भाजप नेत्यांच्या दुटप्पी वृत्तीचा पुरावा

खोट्यारड्या भाजप नेत्यांकडून म्हादईच्या शवपेटीला शेवटचा खिळा

गोमंतक ऑनलाईन टीम

Vijai Sardesai: कळसा-भांडुरा येथील वादग्रस्त सिंचन प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणारच अशी भूमिका कर्नाटक भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केल्यानंतरही सध्या कर्नाटक निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेल्या गोव्यातील एकही भाजप नेत्यांनी त्यावर एक शब्दही उच्चारलेला नाही.

या पार्श्वभूीवर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी, 'या मौनातून गोव्यातील भाजप नेत्यांची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत आहे,' अशी टीका केली आहे.

10 मेच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेल्या आश्वासनानंतर, गोवा फॉरवर्ड पार्टीतर्फे केलेल्या ट्विटमध्ये भगव्या पक्षाच्या या ‘लबाडीच्या ताबूत’मध्ये या स्वार्थी भाजप नेत्यांनी ठोकलेला शेवटचा खिळा, असे म्हटले आहे.

“गोव्यातील भाजप आणि प्रमोद सावंत या खोटारड्या नेत्यांनी म्हादईच्या शवपेटीत आणखी एक खिळा ठोकला असून भाजप कर्नाटकचा निवडणूक जाहीरनामा हा गोवा भाजप नेत्यांच्या माय म्हादई विकण्यात सक्रिय सहभागाचा आणखी एक पुरावा आहे, असे सरदेसाई यांनी ट्विट केले आहे.

"कर्नाटकात प्रचारासाठी गावोगावी फिरत असताना, त्यांना म्हादईवर बोलण्यासाठी त्यांना शब्द सापडत नाहीत, परंतु गोव्याचे मुख्यमंत्री म्हादईचा गळा घोटू पाहाणारे बसवराज बोम्मई यांच्यासाठी मते मागण्यासाठी त्यांच्या आवाजात आवज मिळवून जोरात ओरडू शकतात," सरदेसाई यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यातील भाजप नेते आणि मंत्री आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कर्नाटकातील अनेक विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत.मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते जाहीर सभांमध्ये कन्नडमध्ये बोलतानाही दिसतात.

म्हादईचे पाणी वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मदत केल्याबद्दल गोव्यातील विरोधकांनी या नेत्यांवर निशाणा साधला होता. विजय सरदेसाई यांनी त्यांना पुन्हा एकदा खिंडीत गाठले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT