Shack Business  Dainik Gomantak
गोवा

राज्यातील शॅक व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर; व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

राज्यातील (Goa) किनाऱ्यावरील शॅक व्यवसाय (Shack Business) झाला असून आता प्रतिक्षा आहे ती विदेशी पर्यटकांची (Foreign Tourists).

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) किनाऱ्यावरील शॅक व्यवसाय (Shack Business) झाला असून आता प्रतिक्षा आहे ती विदेशी पर्यटकांची (Foreign Tourists). देशी पर्यटकांची गेल्या महिन्यापासूनच वर्दळ सुरू झाली आहे. त्यामुळे गेले वर्ष कोरोना महामारीमुळे कोलमडलेला शॅक व्यवसाय यावर्षी तरी वेळेवर सुरू झाल्याने शॅक व्यवसायिकांमध्ये उत्साह आहे. पर्यटन खात्याकडून तीन वर्षांसाठी मिळालेल्या शॅक्स व्यवसायाचा यंदा हे तिसरे वर्ष असल्याने अधिकाधिक उलाढाल होण्याची व चार्टर विमानांची प्रतिक्षा शॅकधारकांना आहे. या शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज (Cruz Cardoz) यांनी सांगितले की, 2019- 2022 या तीन वर्षासाठी शॅकचे वितरण करण्यात आले, मात्र 2019 साली पर्यटन मोसम सुरु होऊन तीन महिने झाले अन् जगभरात कोरोना संसर्गाची लाट आली. या लाटेमुळे या व्यवसायावर मोठा आघात झाला.

वर्षासाठीसाठीची परवाना शुल्कसाठी जमा केलेली रक्कमही झालेल्या व्यवसायातून वसूल झाली नाही. त्यानंतर हा व्यवसाय बंद झाला तो आता गेल्या महिन्यापासून सुरू झाला आहे. राज्यात सुमारे 35 हून अधिक समुद्रकिनारी 355 शॅकना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यापैकी दक्षिण गोव्यात 105 तर उत्तर गोव्यात 250 शॅक उभारण्यास परवानगी आहे. गेल्या महिन्यापासून शॅक मालकांनी किनाऱ्यावर शॅकचे बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काहींचा शॅक व्यवसाय सुरू झाला आहे तर काहीजणांचे शॅक बांधण्याचे काम सुरू आहे.

देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने शॅक व्यवसायाला गती मिळू लागली आहे. कळंगुट, बागा, हणजूण व हरमल या भागात पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे ही चांगली बाब आहे असे क्रुझ म्हणाले. तीन वर्षांसाठी करार केलेल्या शॅक व्यवसायाच्या काळापैकी दीड वर्ष कोरोना संसर्गामुळे वाया गेल्याने त्याचा फटका व्यावसायिकांना बसला. त्यामुळे सरकारकडे शॅक व्यवसायातील परवाना शुल्कात ५० टक्के रक्कम माफ करण्याची विनंती मंजूर केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या व्यवसायात गेले दीड वर्ष झालेला तोटा भरून काढणे शक्य नसले तरी निदान शेवटच्या वर्षात तरी हा व्यवसाय सुरू झाला आहे ही समाधानाची बाब आहे.

येत्या 15 ऑक्टोबरपासून केंद्र सरकारने देशात चार्टर विमानांना हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होणार आहे. हे पर्यटक किनारी भागातील शॅकला आवर्जून भेट देतात. त्यामुळे विदेशी पर्यटकांची संख्या या पर्यटन मोसमात वाढून त्याचा शॅक मालकांना होणार आहेच शिवाय सरकारच्याही महसुलात वाढ होणार आहे असे क्रुझ म्हणाले. राज्यातील कसिनो, शॅक, बार व रेस्टॉरंटस् तसेच जलसफरी बोटींना कोरोना मार्गदर्शक सूचनांचे (एसओपी) पालन करण्याच्या अटी घालून परवानगी दिली गेल्याने देशी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. पणजी शहरात संध्याकाळी सहानंतर कसिनो तसेच जलसफरी बोटींच्या प्रवेशासाठी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. एकिकडे कोरोना संसर्गाची लाट संपलेली नसताना हे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने ‘एसओपी’चे तीन तेरा वाजले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार यंत्रणाच तत्पर नसल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT