BJP candidates Dainik Gomantak
गोवा

16 जानेवारीला दिल्लीत होणार भाजपच्या उमेदवारांची निवड

गोव्यातील कुठल्याही मंतदारसंघात भाजपचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत

दैनिक गोमन्तक

सासष्टी : शनिवार 16 जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सांसदीय समितीच्या बैठकीत, गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार निश्र्चित केले जातील. त्यादिवशी संध्याकाळपर्यंत नावे जाहीर केली जातील. आपण त्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आज मडगावी पत्रकारांना सांगितले.

गोव्यातील (goa) कुठल्याही मंतदारसंघात उमेदवार जाहीर झालेले नाही. आजपासून उमेदवार निवडीसाठी बैठका सुरु झाल्या आहेत. प्रत्येक मतदार संघात एक दोन उमेदवार आहेत. पक्षाच्या सांसदीय समितीच्या बैठकीत उमेदवार निश्र्चित केले जातील असे मुख्यमंत्री (CM) पुढे म्हणाले.

गुण घोटाळ्याची आपल्याला कल्पना नाही

ज्या कोणी गुण घोटाळा झाल्याचे जाहीर केले आहे व त्यात आपला हात आहे, असा आरोप केला आहे तो वैफलग्रस्त झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्याची आपल्याला कींव येते. एमबीबीएसच्या पॅथोलॉजी विषयात आपल्या पुतण्याला जास्त गुण द्यावे म्हणून मुख्यमंत्र्यांनी डीनवर दबाव टाकला असा आमदार विजय सरदेसाई यांनी आरोप केला होता.

या संबंधी विचारलेल्या प्रश्र्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, हा आरोप धांदात खोटा आहे. आपल्याला याची काहीच कल्पना नाही. आपण डीनला या प्रकरणी जाहीर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुलांच्या शिक्षणाकडे मी कधीही हस्तक्षेप करणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT