उत्पल पर्रीकरांना तिकीट देणार का? फडणवीसांचं रोखठोक उत्तर

उत्पल पर्रीकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Devendra Fadnavis on Utpal Parrikar
Devendra Fadnavis on Utpal Parrikar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : पणजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. शिवाय ट्विटरवर 'आता मागे वळून पाहणार नाही' असे ट्वीट काही दिवसांपूर्वीच केले आहे. त्यामुळे उमेदवारी मिळो अथवा न मिळो, पणजीतून निवडणूक लढवणारच असा ठाम निश्चिय जाहीर केल्याने भाजपसमोरचा पेच वाढला आहे.

दरम्यान, यावर बोलताना आज भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे फक्त पुत्र म्हणून उत्पल पर्रीकर यांना तिकीट देता येणार नाही. पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उत्पन्न परिकर (Utpal Parrikar) यांना तिकीट मिळणार नाही, पर्रीकरांनी पक्ष वाढीसाठी आणि गोव्यासाठी भरीव योगदान दिले आहे. मात्र पर्रीकरांचा मुलगा उत्पल परिकर यांना तिकीट उमेदवारी मिळणार नाही त्यासाठी त्यांचं कार्य कर्तुत्व लक्षात घेतल जात.

Devendra Fadnavis on Utpal Parrikar
शरद पवारांनी यापूर्वीही हातात हात घेत आघाड्या केल्या होत्या...

फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक (Assembly Election) पणजी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढणार असल्याचे उत्पल यांनी जाहीर केले आहे. पक्षाने मात्र त्यांच्या उमेदवारीला होकार दिलेला नाही. त्यामुळे आता उत्पल पर्रीकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी उत्पल यांना गोव्यातील (Goa) भाजपचे (bjp) निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून “सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करण्याचा” अनुकूल सल्ला मिळाला होता. त्यावेळी उत्पलने आपल्या वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घेतले होते, परंतु आता त्याचे मत बदलल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com