Vasco  Dainik Gomantak
गोवा

Vasco News : शिपयार्डसमोरील रम्बलर्स हटवावेत; स्थानिकांची मागणी

Vasco Local demand : येथील गोवा शिपयार्डसमोर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलर्स घातले आहेत. जरी हे रम्बलर्स घातले असले तरी चारचाकी वाहने यावरून वेगाने जातात.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को, गोवा शिपयार्डसमोरील रम्बलर्स हटविण्यात यावेत, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. येथील कित्येक घरांना या रम्बलर्समुळे तडे गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.

येथील गोवा शिपयार्डसमोर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलर्स घातले आहेत. जरी हे रम्बलर्स घातले असले तरी चारचाकी वाहने यावरून वेगाने जातात. तसेच बस, ट्रक, टँकर अशी अवजड वाहने जाताना या रम्बलर्समुळे जमिनीला कंप सुटतो, त्यामुळे येथील घरांना तडे जाण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी याठिकाणी एक मोठे आंब्याचे झाड मुळापासून उन्मळून एका घरावर पडले.

यामुळे घरमालकाची मोठी वित्तहानी झाली आहे. जरी झाड पावसाच्या तडाख्यात पडले असले तरी या मुख्य रस्त्यावर घातलेल्या रम्बलर्समुळे त्याला मार बसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या रम्बलर्समुळे या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घरांनाही कंप सुटतो व यामुळे घरांना तडे जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच घरातील जमीनही खचत असल्याचे सांगितले. त्यामुळे घरांना व लोकांना यापासून धोका निर्माण झाला आहे.

मोठा गतिरोधक उभारा!

हा प्रकार वास्कोचे आमदार कृष्णा साळकर तसेच माजी नगराध्यक्ष तथा स्थानिक माजी नगरसेवक नंदादीप राऊत यांच्या कानावर घातला. त्यानंतर राऊत यांनी या ठीकाणी येऊन पाहणी केली. हे रम्बलर्स काढून त्या ठिकाणी मोठा गतिरोधक बसवण्यात यावा, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

SCROLL FOR NEXT