शिवोलीत रस्त्यांची चाळण झाली असून, यामुळे या भागात अपघात होत आहेत.  Dainik Gomantak
गोवा

Goa: शिवोलीतील रस्त्यांची चाळण मात्र साबांखात्याचे कानावर हात

शिवोलीचे आमदार तथा माजी जलसंपदा मंत्री असलेल्या विनोद पालयेंकर यांच्या अथक प्रयत्नानंतर या भागात नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाची सुरुवात सुमारे दोन वर्षाआधीच सुरू झाली होती.

दैनिक गोमन्तक

शिवोली : मार्ना-शिवोली (Marna-Shivoli) येथील मुख्य रस्ता (road) सध्या शेवटच्या घटका मोजत असून या भागातून नियमित पणे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना सध्या चंद्रावरील खडकाळ प्रदेशातून वाहने हाकत असल्याचा भयंकर अनुभव येत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, पूर्णपणे उखडलेल्या खड्ड्यांतून मार्ग काढतांना अनेक दुचाकी चालक अपघातात (Accident) सापडल्याने सध्या  रुग्णालयात (hospital) उपचार घेत असून खडड्यांमुळे खिळखीळी झालेली चारचाकी वाहने गेरेजमध्ये विसावा घेत असल्याचे दिसून आले. 

दरम्यान, केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पातील एक असलेल्या  तिळारी प्रकल्पालीत पाण्याचासाठा बार्देशातील लोकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवोलीचे आमदार तथा माजी जलसंपदा मंत्री असलेल्या विनोद पालयेंकर यांच्या अथक प्रयत्नांनंतर याभागात नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाची सुरुवात सुमारे दोन वर्षाआधीच सुरू झाली होती.  दरम्यानच्या काळात कोवीड महामारीच्या पार्श्वभूमीवर  25  मार्च 2020 पासून राज्यात  टाळेबंदी लागू करण्यात आल्याने परराज्यातील कामगार तसेच तंत्रज्ञ आपापल्या  गांवी निघून गेल्यामुळे  याकामात मोठ्या प्रमाणात खंड पडला.

नंतरच्या काळात येथील नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम पुन्हां सुरू करण्याचा प्रयत्न केला असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राज्यात कर्फ्यु जारी करण्यात आला, त्यामुळे आधीच रेंगाळलेले अधिकच ताणले गेल्यामुळे यंदाच्या पावसाळ्याआधी पुर्णत्वास यावयाचे सदरचे काम अद्याप अपुर्णावस्थेत असल्याची कबुली खुद्द विनोद पालयेंकर यानीच दै. गोमन्तकच्या स्थानिक प्रतिनिधीशी बोलतांना दिली. कारण काहीही असो सध्या मार्ना शिवोली ते म्हापसा आणी शिवोली ते आंसगांव पंचक्रोशीकडे जाणारा रस्ता म्रुत्यूचा सापळा बनल्याचे याभागाचा दौरा केला असतां दिसून आले. दरम्यान, गेल्या महिन्याभरात राज्यात झालेल्या धुवांधार पावसामुळे येथील रस्त्याची पार दुर्दशा झाल्याचे लक्षात घेत याभागात एखाद्या वाहधचालख अथवा पादचार्याचा बळी जाण्यापूर्वीच निदान पावसापुरती रस्त्यांची डागडुजी करण्याचा निर्णय स्थानिक आमदार विनोद पालयेंकर यांनी घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT