Hindu Janjagruti Samiti Dainik Gomantak
गोवा

Hindu Janjagruti Samiti: ‘गोवा फाईल्स’मधून गोव्याचे वास्तव उलगडावे!

रामनाथीत आजपासून हिंदू अधिवेशन : साडेतीनशे संघटनांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित

गोमन्तक डिजिटल टीम

Hindu Janjagruti Samiti हिंदूंवरील अत्याचाराचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न झाला असून काश्‍मिरी हिंदूंवरील अत्याचाराचे भीषण वास्तव ‘दी काश्‍मीर फाईल्स’ आणि त्यानंतर केरळमधील अत्याचाराचे वास्तव ‘द केरला स्टोरी’तून समोर आले आहे.

गोव्यातील अत्याचाराचे वास्तव ‘गोवा फाईल्स’मधून पुढे येणे आवश्‍यक आहे. तसेच लव्ह जिहादविषयीही जागृती व्हावी, असे हिंदू जनजागृती समितीचे अभय वर्तक यांनी सांगितले.

रामनाथी-फोंड्यात वैश्‍विक हिंदू अधिवेशनाचे आयोजन शुक्रवार, १६ ते गुरुवार, २२ रोजीपर्यंत करण्यात आले आहे. या सात दिवसीय हिंदू अधिवेशनात देशभरातील ३५० संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्याची जय्यत तयारी रामनाथी येथील रामनाथ देवस्थानच्या सभागृहात करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती हिंदू जनजागृती समितीतर्फे देण्यात आली.

फोंड्यातील या अधिवेशनासंबंधीची माहिती हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी सुनील घनवट, अभय वर्तक, नीलेश सांगोलकर व सत्यविजय नाईक यांनी दिली.

यंदाचे हे अधिवेशनाचे अकरावे वर्ष असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर, काशी ज्ञानव्यापी मुक्तीसाठी लढा देणारे ॲड. विष्णू शंकर जैन, तेलंगणामधील आमदार टी. राजासिंह, हिंदू इकोसिस्टमचे संस्थापक कपिल मिश्रा, विश्‍व हिंदू परिषदेचे संपर्क प्रमुख जनार्दन महाराज मेटे, भारत माता की जय संघटनेचे प्रा. सुभाष वेलिंगकर व इतरांची उपस्थिती यावेळी असेल.

गेली दहा वर्षे हिंदू अधिवेशन रामनाथी येथे सातत्याने घेतले जात असून यंदाचे हे अकरावे वर्ष आहे. या अधिवेशनात हिंदू राष्ट्र स्थापन करण्याच्या दिशेने योग्य पावले टाकण्यासंबंधीच्या विषयावर चर्चा करण्यात येईल.

नऊ देशांसह भारतातील अठ्ठावीस राज्यांतील साडेतीनशे संघटनांचे सुमारे साडेआठशे प्रतिनिधी हिंदू अधिवेशनात उपस्थिती लावणार आहेत.

या विषयांवर होणार चर्चा...

1. रामनाथी-फोंड्यात आयोजित यंदाचे हिंदू अधिवेशनाचे अकरावे वर्ष आहे. सात दिवस चालणाऱ्या या हिंदू अधिवेशनात हिंदू राष्ट्र समन्वय समिती स्थापन करण्यासाठी प्रत्यक्ष नियोजनावर चर्चा करण्यात येईल.

2. हिंदू राष्ट्र स्थापनेला गती देण्यासाठी पूरक विचारविनिमय करण्याबरोबरच लव्ह जिहादमुळे बरबाद होणाऱ्या हिंदू युवतींना वाचवण्यासाठी पुढील रणनीती स्पष्ट करणे तसेच गेम जिहादच्या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतरण करण्याचे प्रकार उघड झाल्याने त्यासंबंधीही चर्चा करून योग्य निर्णय घेणे व इतर विषयांवर गंभीरपणे चर्चा करून निश्‍चित धोरण ठरवण्यात येईल.

3. मंदिरांचे योग्य नियोजन व इतर विषयांवर परिसंवादाबरोबरच गोव्यात पोर्तुगीज काळात हिंंदूंवर झालेल्या अत्याचारासंबंधी वाचा फोडण्यासाठी ‘द गोवा फाईल्स’ची निर्मिती करण्यासंबंधीही चर्चा होणार आहे.

पोर्तुगीज काळात गोव्यात हिंदूंवर अत्याचार झाले. देशातील इतर ठिकाणीही अशाप्रकारच्या घटनांची माहिती हिंदूंना का असू नये, असा एक प्रश्‍न सातत्याने समोर येत आहे.

आता गोव्यातील हिंदूंच्या अत्याचारावरील ‘गोवा फाईल्स’ का येऊ नये? गोमंतकीयांच्या सोशिकतेला वाचा ही फोडायलाच हवी आणि या अधिवेशनात यासंबंधीची चर्चा प्रामुख्याने होणार आहे.

- रमेश शिंदे, प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

देशात हिंदूंचे अस्तित्व टिकवण्यासाठी येथे हिंदू राष्ट्र बनवण्याशिवाय पर्याय नाही. मागच्या दहा अधिवेशनांच्या माध्यमातून यासंबंधीचा विचार सगळीकडे पोहोचला असून हिंदू अधिवेशन त्यासाठी उपयुक्त ठरले आहे. देशात मोठ्या प्रमाणात इस्लामीकरण आणि ख्रिस्तीकरण सुरू असल्याने अनेक ठिकाणी हिंदू आपल्या अस्तित्वासाठी लढत आहेत, अशावेळेला सर्व हिंदूंनी संघटित होणे गरजेचे आहे.

- सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती

आतापर्यंतच्या हिंदू अधिवेशनात सुरू झालेली हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसंबंधीची चर्चा आता केवळ भारतातच नव्हे तर वैश्‍विक पातळीवर होण्यास प्रारंभ झाला आहे. ही संकल्पना आता दृढ झाली असल्याने हिंदू राष्ट्र दृष्टिपथात येत आहे.

- सत्यविजय नाईक, हिंदू जनजागृती समिती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT