COSAMB Festival in Goa 2023: भारतातील सर्व राज्य कृषी विपणन मंडळांची फेडरेशन म्हणून कार्यरत असलेल्या COSAMB (राष्ट्रीय कृषी विपणन मंडळ) या संस्थेची परिषद गोव्यात होणार आहे.
19 ते 21 जून 2023 या कालावधीत बाणावली येथील हॉटेल फॉर्च्युन येथे ही परिषद होणार आहे. उत्तराखंडचे कृषी मंत्री गणेश जोशी यांनी ही माहिती दिली.
गोवा राज्य कृषी पणन मंडळ (GSAMB) सासष्टी, गोवा आणि नॅशनल कौन्सिल ऑफ स्टेट अॅग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड (COSAMB) नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले जात आहे.
नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केट (e-NAM) हे कृषी मालासाठीचे इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल आहे. याद्वारे सर्व बाजारसमित्या जोडल्या गेल्या आहेत. या राष्ट्रीय परिषदेत “ई-नाम : कार्यान्वयनातील अडचणी आणि संधी” या विषयावर मंथन होणार आहे.
या परिषदेचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद पांडुरंग सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला गोव्याचे कृषी मंत्री रवी नाईक आणि उत्तराखंडचे कृषी मंत्री गणेश जोशी आणि विविध राज्यांचे कृषी पणन मंडळांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
COSAMB ही राष्ट्रीय स्तरावरील स्वायत्त संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली होती. या संस्थेला एमडी आणि कार्यकारी समितीदेखील आहे. सदस्य बोर्डांशी समन्वय, चर्चा, अर्थपूर्ण माहितीची देवाणघेवाण करण्याचे काम ही संस्था करते.
तसेच देशामध्ये कृषी विपणन सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सीशी समन्वय, तंत्रज्ञान आणि प्रणाली बाबतही धोरण ठरविण्याचे कामदेखील ही संस्था करते.
तेलंगणा, आंध्र प्रदेश, सिक्कीम, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गोवा इत्यादी भारतातील विविध राज्य कृषी पणन मंडळांचे एकूण 25 ते 30 भारतीय प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होतील आणि त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.