Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला
Drunk Tourist At CalanguteDainik Gomantak

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Calangute Viral Video: पर्यटकांच्या या विचित्र वागण्यामुळे मार्गवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली व स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
Published on

कळंगुट: गोव्यात येऊन हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांची संख्या काही कमी नाही. काहीजण तर नियमांचे उल्लंघन करुन बेकायदेशीर गोष्टी करतात. वारंवार समोर आलेल्या अशा घटनांत संबधितांना अटक व दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशाच प्रकारची एक विचित्र घटना कळंगुट येथून समोर आलीय. मद्यधुंद अवस्थेतील पर्यटकाने नग्न होऊन रस्त्यात राडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

झाले असे की, अँथनी चॅपलजवळ एका मद्यधुंद अवस्थेतील पर्यटकाने कपडे काढत पूर्ण नग्न होऊन भर रस्त्यात राडा घातला. पर्यटकाने रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांची अडवणूक केली. रस्त्यावरच उभ्या असलेल्या एका कारवर चढाई केली, त्यानंतर मार्गस्थ असलेल्या एका बसच्या समोर जाऊन झोपला.

पर्यटकांच्या या विचित्र वागण्यामुळे मार्गवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली तसेच, याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघ्याची गर्दी झाली होती.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला
Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

दरम्यान, या पर्यटकाची संपूर्ण माहिती मिळू शकली नाही. तो कुठून आला होता तसेच त्याने असं का केलं याबाबत माहिती समोर आलेली नाही. पण, पर्यटकांच्या या विचित्र वागण्यामुळे स्थानिकांना तसेच मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com