Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News : गोव्याची खरी श्रीमंती जगापुढे आणणार : सभापती रमेश तवडकर

Goa News : मडगावात लोकोत्सवाबाबत जागृती, मान्यवरांचा सत्कार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : सासष्टी, काणकोणातील आमोणे, पैंगीण येथील आदर्शग्रामात आदर्श युवा संघातर्फे २३ वा लोकोत्सव ८ डिसेंबरपासून तीन दिवस भरवण्यात येणार आहे.

या लोकोत्सवाच्या जागृतीसाठी सभापती रमेश तवडकर यांनी सुरवात केली असून शुक्रवारी मडगाव येथील रवींद्र भवनात फातोर्डा व मडगावातील लोकांसाठी जागृती कार्यक्रम घडवून आणला.

यावेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, माजी आमदार दामोदर नाईक, जिल्हा परिषद सदस्य परेश नाईक, नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी तवडकर यांनी सांगितले की, गोव्याची खरी श्रीमंती संस्कृती, खाद्य पदार्थ व औषधात आहे. हीच श्रीमंती देश व जगापुढे आणणे गरजेचे आहे. लोकोत्सवाद्वारे या श्रीमंतीचे प्रदर्शन केले जाणार असून त्यांतून गोव्याची खरी संस्कृती प्रदर्शित केली जाणार आहे.

बाहेरील राज्यात गोव्याची प्रतिमा डागाळलेली आहे, याचे कारण गोव्याची खरी माहिती दिली जात नाही.तसेच गोव्यात जे गुन्हे होतात त्यात ७० ते ७५ टक्के परराज्यातील लोकांचा हात असतो, असे ते म्हणाले. लोकोत्सव हा गोव्याच्या संस्कृतीचा ब्रॅण्ड बनलेला आहे, असे माजी आमदार दामोदर नाईक यांनी सांगितले. मुलांना या लोकोत्सवाद्वारे संस्कृती, परंपरेची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचेही नाईक यांनी सांगितले.

काणकोणला सांस्कृतिक हब करणार

लोकोत्सवाद्वारे गोव्याच्या संस्कृतीचे संवर्धन होणे व काणकोणला सांस्कृतिक हब करण्याचा आपला संकल्प आहे. आदर्शग्राम केवळ लोकोत्सवापुरता नसून तो ३६५ ही दिवस खुला ठेवण्यात येईल. त्यामुळे गोव्याच्या भावी पिढीला तसेच पर्यटकांना गोव्याची खरी माहिती मिळणार आहे, असेही तवडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT