Goa Death Case: अनुपमाच्‍या आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍टच

Goa Death Case: 2 दिवसांत 2 आत्‍महत्‍येच्‍या प्रकरणांमुळे डिचोली तालुका हादरला
Goa Accidental Death
Goa Accidental DeathDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Death Case: दोन दिवसांत दोन आत्‍महत्‍येच्‍या घटना घडल्‍यामुळे डिचोली तालुका हादरला आहे. काल शनिवारी आमोणे पुलावरुन उडी मारून आत्महत्या केलेल्या वेळगे-सत्तरी येथील अनुपमा गावकर या युवतीचा मृतदेह आज पिळगाव परिसरात मांडवी नदीच्‍या पात्रात तरंगताना आढळून आला.

Goa Accidental Death
Leopard In Goa: ‘ब्लॅक पॅंथर’ऐवजी बिबटा अडकला!

घरातील एकुलती एक मुलगी असलेल्‍या अनुपमाने आत्‍महत्‍येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अजूनही स्‍पष्‍ट झालेले नाही.

दुसऱ्या एका घटनेत आज रविवारी मुळगाव येथील सुश्मिता विश्राम राऊत (५२) या महिलेने राहत्या घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना काल मध्यरात्री घडली.

पिळगावात सापडला मृतदेह

अनुपमा गावकर या युवतीने काल सायंकाळी आमोणे पुलावरुन नदीत उडी मारली होती. काल सायंकाळपर्यंत तिचा थांगपत्ता लागला नव्हता. डिचोली अग्निशमन दलाने आज रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम हाती घेतली असता पिळगाव परिसरात मांडवी नदीच्‍या पात्रात तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Drowning Death
Sai Krishna Custody Death Case
Calangute Resort Death Case
Karnataka Tourist Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com