The rape victim, who went missing from Pune, was found in Colva this morning Dainik Gomantak
गोवा

पुण्यातील 'त्या' युवतीला कोलवा पोलिसांनी केलं पालकांकडे सुपूर्द

महाराष्ट्रातील नेत्याच्या लैंगिक अत्याचाराला युवती पडली बळी

दैनिक गोमन्तक

मडगाव : महाराष्ट्रातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक याने बलात्कार केल्याची तक्रार केलेली पीडित 24 वर्षीय युवती मंगळवारी रात्री कोलव्यात सापडल्याने खळबळ माजली होती. या युवतीला शेवटी काल रात्री तिच्या पालकांकडे देण्यात आले.

युवती दोन दिवसांपूर्वी पुण्यातून गायब झाली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास गंधावली कोलवा येथे एका घराची बेल तिने वाजवल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. ज्या घराची तिने बेल वाजवली त्या घरच्या माणसांनी कोलवा पोलिसांकडे संपर्क साधल्यावर पहाटे 4 च्या सुमारास तिला ताब्यात घेण्यात आले.

कोलवा (Colva) पोलिसांनी नंतर पुणे पोलिसांकडे संपर्क साधल्यावर पुणे पोलीस काल रात्री तिच्या पालकांसह कोलव्यात हजर झाले व तिला ताब्यात घेतले अशी माहिती कोलवा पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिली.

त्या युवतीने पोलिसांना (police) दिलेल्या माहितीनुसार पुण्यात (pune) तिला कुणीतरी गुंगीचे औषध देऊन नंतर तिच्याकडून एका कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर आपण गोव्यात (goa) कशी पोहोचली हे आपल्याला ठाऊक नाही असे तिने सांगितले. त्यामुळे या प्रकरणात गूढ वाढले असून पुणे पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT