Chorao Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Chorao Ferry Boat: चोडण येथे फेरीबोटीचा तराफा तुटला; बोटीतच अडकून पडले प्रवासी

Chorao Ferry Boat: प्रवाशांना मनस्ताप; दोन कार, आठ दुचाकींचा समावेश

Akshay Nirmale

Chorao Ferry Boat: चोडण फेरी धक्क्याजवळ एका फेरीबोटीचा तराफा तुटल्याने अनेक प्रवाशांना त्यांच्या गाड्यांसह बोटीतच अडकून पडावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे

तब्बल दोन तासाहून अधिक काळ हे प्रवासी बोटीतच अडकून पडले आहे. दोन मोठ्या गाड्या आणि किमान सात ते आठ दुचाकी या फेरीबोटत आहेत.

ऐन कार्यालयीन वेळच्या काळात ही घटना घडल्याने अनेक नागरीकांना मनस्ताप झाला. जोपर्यंत क्रेन येत नाही तोपर्यंत हे प्रवासी गाड्यांसह तिथेच अडकून पडणार आहेत. या प्रकाराबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तराफा तुटल्याने फेरीबोटीतील प्रवासी किनाऱ्यावर येऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहेत. त्यामुळे त्यांना फेरीबोटीतच अडकून पडावे लागले आहे. तसेच त्यांच्या गाड्याही तिथेच अडकल्या आहेत. आता या प्रकाराला जवळपास 2 तास उलटून गेले आहेत.

शिवाय या फेरी बोटीचा तराफा दुरूस्त होत नाहीत तोपर्यंत ती किनाऱ्यावर येऊ शकणार नाही. तथापि, ही एक फेरीबोट तराफा दुरूस्त होईपर्यंत निकामी झाल्यासारखी आहे. त्यामुळे इतर फेरीबोटींवरील ताणदेखील वाढणार आहे. फेरीबोटीतून नदी ओलांडण्यासाठी येथे अनेक गाड्यांची रांग लागलेली दिसून आली.

या घटनेबाबत बोलताना येथील स्थानिक अश्विन चोडणकर म्हणाले की, आमदारांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. रात्री नऊ-दहा वाजल्यानंतर फेरी बोटींवर पार्ट्या सुरू असतात.

11 नंतर स्पेशल फेरीसाठी मोठ्या गाड्यांना 50 रूपये द्यावे लागतात. त्यामुळे दहा-साडे दहा नंतरच फेरीबोटवाले मुद्दामहून विलंब करतात. पाच पैकी 2 फेरी बोटी जुन्या आहेत. तीन नवीन आहेत. जुन्या फेरी धोकादायक आहेत.

तराफा नदीच्या किनाऱ्यावर आल्यावर तुटला पण जर तराफा मध्येच तुटला असता तर मोठी अडचण झाली असती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT