The Purple Fest 2023 Dainik Gomantak
गोवा

The Purple Fest 2023: आगळ्यावेगळ्या ‘द पर्पल फेस्ट’चे पर्वरी येथे आयोजन

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान ‘द पर्पल फेस्ट’ महोत्सवाचे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

The Purple Fest 2023: गोवा राज्य अपंग आयोगाने, समाजकल्याण आणि मनोरंजन सोसायटी ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आगळावेगळा ‘द पर्पल फेस्ट’ जाहीर केला आहे. पर्वरी येथे 6 ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत हा महोत्सव होणार असल्याची माहिती समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सोमवारी (दि.10) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोवा राज्य अपंग आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

‘द पर्पल फेस्ट’ हा तीन दिवसांचा वैविध्यपूर्ण कार्यक्रम आहे. या महोत्सवाचा उद्देश समाजातील एकोपा, बंधुता आणि समानता जपणे व लोकांना एकत्र आणणे आहे. असे , फलदेसाई यांनी म्हटले आहे.

महोत्सवात लाइव्ह परफॉर्मन्स, भव्य प्रदर्शन, क्रीडा इव्हेंट्स, इमर्सिव्ह अनुभव झोन आणि इनोव्हेशन यात्रा व उत्सव यांचा समावेश असेल. यात विविध स्पर्धा, चित्रपट प्रदर्शन, मेगा कार रॅली तसेच, शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि जीवन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा यांचा समावेश असेल.

पर्पल किंवा जांभळा रंग अपंगत्वाशी जोडला गेला आहे. अपंग लोकांचे विविध क्षेत्रातील योगदान याबाबत सकारात्मक माहिती आणि दृष्टीकोन निर्माण करणारा आहे. अपंगत्व हा अडथळा नसून, त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा खरा अडथळा आहे. असे गोवा राज्य अपंग आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल 'शौर्यवाडा'चे मालक थेट CM प्रमोद सावंतांच्या भेटीला, काय चर्चा झाली? सोशल मीडियावर Post Viral

Post Office Schemes: बँकेपेक्षा जास्त परतावा! पोस्ट ऑफिसच्या 'या' 5 योजनांमध्ये करा गुंतवणूक; जबरदस्त व्याजाची ऑफर

Goa Ranji Cricket: गोवा क्रिकेटबद्दल मोठी बातमी! रणजीसाठी निवडला नवीन Captain; 'या' कारणास्तव मुकणार पहिल्याच सामन्याला

‘गोव्याच्या कथा चित्रपटामार्फत जगभर पोहोचत आहेत, याचे श्रेय तरुण दिग्दर्शकांना'; अभिनेत्री सोबिता कुडतरकर यांचे प्रतिपादन

IND vs WI: भारताचा वेस्ट इंडिजला 'व्हाईटवॉश'! दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्सने लोळवलं; 'हे' 4 खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

SCROLL FOR NEXT