problem of traffic jams in ponda persists Dainik Gomantak
गोवा

फोंड्यातील वाहतूक कोंडीची समस्या कायम

पादचाऱ्यांना त्रास: जागा निश्चित करूनही बेशिस्त पार्किंग

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंड्यात सध्या बेलगाम वाहतूक झाली असून हा भूलभुलैय्या सुटणे कठीण झाल्यासारखे वाटायला लागले आहे. खासकरून दादा वैद्य चौकात तसेच आल्मेदा स्कूलनजीक वाहतूक कोंडी होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. वाहतूक पोलिस ठिकठिकाणी तैनात केले गेले असले, तरी वाहतुकीची समस्या सोडविणे त्यांच्याही आवाक्याबाहेरचे ठरत आहे.

(The problem of traffic jams in ponda persists)

दादा वैद्य चौकाजवळ फोंड्याचा जुना बसस्थानक असल्यामुळे तेथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. बसगाड्या आत - बाहेर करत असल्यामुळे तेथून जाणाऱ्या वाहनांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

जुना बसस्थानक ते फोंडा - तिस्क हे अंतर साधारण अर्धा किलोमीटरचे आहे, पण या अर्धा किलोमीटरच्या अंतरात या बसगाड्या अनेक थांबे घेत असतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडते. तसेच रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीचा पादचाऱ्यांना त्रास होत आहे. सध्या वाहतूक पोलिसांनी पार्किंगसाठी जागा निश्चित केली असली, तरी ती जागा अपुरी पडू लागली आहे.

एक किलोमीटरसाठी चक्क अर्धा तास!

वाहतूक कोंडीमुळे विठोबा मंदिर ते दादा वैद्य चौक हा साधारण एक किलोमीटरचा रस्ता पार करताना वाहनचालकांना अर्धातास खर्च करावा लागत आहे. चारचाकी वाहनांना तर अक्षरशः ‘धीरे धीरे चल’ अशा लयीत वाहन चालवावे लागते. या समस्येवर त्वरित तोडगा काढून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.

मंत्र्यांनी समस्या सोडविण्याची मागणी

फोंड्याचे आमदार रवी नाईक हेच या समस्येवर तोडगा काढू शकतात. मागे 2002 साली त्यांनीच बगल रस्ते करून फोंड्याची तेव्हाची वाहतूक समस्या नियंत्रणात आणली होती. आता त्याची पुनरावृत्ती होण्याची गरज आहे. कृषीमंत्री रवी नाईक यावर कोणती रणनीती आखतात याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Protected Monuments: गोव्यातील 15 प्राचीन स्मारकांना संरक्षित स्थळांचा दर्जा; हात कातरो खांब, मर्दनगड किल्ल्यासह ऐतिहासिक वास्तूंचा समावेश

Goa Politics: 'भाजपला हरवायचा प्लॅन काय?' काँग्रेसने स्पष्ट करावे; 'आप'चे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नायक यांचा थेट सवाल

Goa Business Regulations: उद्योगांसाठी नियम सुलभ करणाऱ्या कायद्याला राज्यपालांची मंजुरी; परवानग्या, अनुपालन प्रक्रिया होणार सोपी

UPI Charges: ना टॅक्स, ना सेस... युपीआय पेमेंट्सबाबत अर्थमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; ग्राहकांच्या खिशावर कोणताही भार पडणार नाही VIDEO

SIM Card Security Advisory: सिम कार्ड दुसऱ्याला देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा! होऊ शकतो 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांचा दंड; सरकारकडून हाय-अलर्ट ॲडव्हायजरी जारी

SCROLL FOR NEXT