Bhoma Road Dainik Gomantak
गोवा

Traffic Rule: भोम परिसरात पुन्हा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम

Traffic Rule: भोम येथील प्रसिद्ध कालोत्सवावेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही वाहतूक कोंडीसोबत वाहतूक पोलिसांच्या शिट्या आणि धावपळ दृष्टीस पडली.

दैनिक गोमन्तक

Traffic Rule: भोम येथील प्रसिद्ध कालोत्सवावेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही वाहतूक कोंडीसोबत वाहतूक पोलिसांच्या शिट्या आणि धावपळ दृष्टीस पडली. या कालोत्सवात सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.

गावामधून जाणारा महामार्ग, दुतर्फा घरे, दुकाने, त्यात फेरीवाल्यांची गर्दी यामुळे दरवर्षी कालोत्सवावेळी वाहतूक कोंडीची समस्या सतावते. फोंडा ते पणजी महामार्ग भोम गावात रस्ता अतिशय अरुंद आहे. दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत होती पण संध्याकाळनंतर कालोत्सवात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यानंतर कुंडई ते बाणसारीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

फोंड्याहून पणजीला जाताना भोम शिवाय दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने या वाहतूक कोंडीची समस्या कायम सतावत आहे. त्यामुळे बगल रस्ता आवश्‍यक झाला आहे. परंतु या रस्त्याचा विषय जटिल बनला असून सरकार तसेच भोमवासीय आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT