Onion Dainik Gomantak
गोवा

Goa News: बाजारात कांद्याच्या दराने गाठले ‘अर्धशतक’

Goa News: 50 रुपये किलो: परतीच्या पावसाचा परिणाम, दसऱ्यानंतर उतरणार दर

दैनिक गोमन्तक

Goa News: पणजी गेल्या महिन्यात टोमॅटोने प्रतिकिलो शंभरीचा आकडा पार केला होता, तर आता कांद्याने सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कारण 30 ते 35 रुपये प्रती किलो दराने विकला जाणारा कांदा पणजी बाजारात तब्बल 50 रुपये प्रती किलो दराने विकला जात आहे. ऐन सण-उत्सवाच्या काळात दरात वाढ झाल्याने नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.

केवळ दोन दिवसातच अकस्मितपणे एक किलोमागे तब्बल १२ ते १५ रुपये वाढ झाल्याने विक्रेते तसेच ग्राहक चकीत झाले आहेत.

कांद्यासह लिंबाच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ५ ते ७ रुपये एक दराने लिंबू विकले जात आहे. कारली, बिन्स, आले, लसूण यांचे दरही मागील दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पुढील दोनतीन दिवसात कांद्याची आवक बाजारात पुन्हा सुरळीत होईल, त्यामुळे दसऱ्यानंतर कांद्याचे दर पुन्हा आवाक्यात येती, असे फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई यांनी सांगितले.

कांद्याचा दर बाणस्तारी बाजारात गुरुवार, शुक्रवारी मात्र ४० रुपये होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करण्यात आला. आणखी कांदा महागणार म्हणून ग्राहकांनी एक किलोच्या ठिकाणी दोन, तीन किलो कांदा खरेदी करण्यात आला.

पाच दिवस आवक मंदावली!

कांद्याला जर पाणी लागले, तर तो सडायला लागतो, त्यामुळे त्याला पाण्यापासून वाचविणे गरजेचे असते. परतीचा पाऊस पावसामुळे कांद्याचे नुकसान झाला. त्यामुळेच कांद्याचे दर वाढले आहेत. चार-पाच दिवस शेतकऱ्यांनी बाजारात कांदा उतरवलाच नाही, त्यामुळे कांद्याला मागणी वाढली. परंतु मागणी तेवढा पुरवठा होत नसल्याने दोन दिवसातच दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई यांनी सांगितले.

बेळगावातही कांदा महागला

बेळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) गत बाजाराच्या तुलनेत कांदा दरात बुधवारी दोन हजार रुपयांची वाढ झाली. महाराष्‍ट्रातील जुना कांदा प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये तसेच कर्नाटकातील नवीन कांदा तीन हजार ते ४५०० रुपये होता. जुने कांदे ३५ गाड्या, तर नवीन कांदा ४० गाड्या दाखल झाला होता.

बाजारात कांदा दर ३५ ते ५० रुपये असा होता. बेळघावात उत्तम कांदा (नंबर १) ५० रुपये आहे, परंतु बेळगावात ३५ ते ४० रुपये दराने विक्री होणारा कांदा गोव्यात ५०रुपये दराने विकला जात आहे. छोट्या आकाराचा कांदा ३५ रुपये दराने विक्री सुरू आहे.

जुने लहान कांदे प्रतिक्विंटल तीन ते साडेतीन हजार, मध्यम ३५०० ते ४२०० रुपये तसेच मोठे कांदे ४२०० ते ५ हजार रुपये असा दर होता. हा कांदा टिकाऊ असल्याने कांद्याला मागणी होती. नवीन लहान कांदा ३००० ते ३५०० रुपये, मध्यम कांदा ३५०० ते ४ हजार रुपये तसेच मोठा कांदा ४ हजार ते ४५०० रुपये दर होता. कांद्याला हरियाणा, पंजाब, हैद्राबाद, नागपूर आदी भागांतील ग्राहक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गोव्यातील व्हिलांमधून 900 कोटींचे कथित सायबर रॅकेट! मुंबई पोलिसांची कारवाई; 22 जणांना अटक

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT