Tamnar Project : राज्यात तम्नार प्रकल्प हवा : पर्यावरणमंत्री काब्राल

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या ‘वीज साठवणूक आणि व्यवस्थापन’ याविषयावरील चर्चासत्राच्या उद्‍घाटन सत्रात ते बोलत होते.
Nilesh Cabral
Nilesh CabralDainik Gomantak
Published on
Updated on

Tamnar Project : पणजी, राज्यातील वीज स्थिती सुधारण्यासाठी तम्नार प्रकल्प हवा. राज्यातील वीज वितरण व्यवस्था या प्रकल्पामुळेच सुधारू शकेल. केंद्रीय आर्थिक मदतीतून हा प्रश्न सुटण्यासाठी या प्रकल्पाचा आग्रह धरला पाहिजे, असे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी शुक्रवारी (ता.२०) नमूद केले.

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या ‘वीज साठवणूक आणि व्यवस्थापन’ याविषयावरील चर्चासत्राच्या उद्‍घाटन सत्रात ते बोलत होते. काब्राल यांनी जणू आपण वीजमंत्रीच आहोत, या आवेशात तम्नार प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले.

यावेळी चेंबरचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस, गोवा ऊर्जा विकास यंत्रणेचे सदस्य सचिव संजीव जोगळेकर, तेल

आणि नैसर्गिक वायू महामंडळाचे सरव्यवस्थापक अरुण कुमार, न्यू एनर्जी सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शर्मा, बर्नहार्ड व्होएलकर, जितेश कुमार, निकिता पवार आदी यावेळी उपस्थित होते.

गोमंतकीय अर्थव्यवस्था आणि औद्योगिक क्षेत्राचा विचार करून तम्नार प्रकल्पाचे समर्थन केलेच पाहिजे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे वळणाऱ्या उद्योगांना सवलती दिल्या पाहिजेत.

त्यांना सायंकाळी ६ ते रात्री ११ वा.दरम्यानच्या वीजमागणीवर लावण्यात येणाऱ्या १२० टक्के अधिभारातून सूट दिली पाहिजे, असे काब्राल यांनी सांगितले.

Nilesh Cabral
National Games Goa 2023: 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा: गोव्याचे बॅडमिंटनपटू लढले, पण विजयास मुकले

कार्ब उत्सर्जन शून्य करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे, त्याला सर्वांनी साथ दिली पाहिजे. २०३० नंतर ते लक्ष्य गाठण्यासाठी काही कंपन्या आतापासूनच प्रयत्न करत आहेत.

आमचे त्यातील योगदान मोठे की लहान याचा विचार करता कामा नये. प्रत्येकाने समान लक्ष्यासाठी काम केले पाहिजे, असे श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले.

वीज वितरण व्यवस्था सक्षमच असायला हवी याशिवाय एका बाजूने वीजपुरवठा खंडित झाला तर दुसऱ्या बाजूने वीज पुरवण्याची व्यवस्था हवी.

तम्नार प्रकल्पात उत्तर आणि दक्षिण गोव्यात वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्याची तरतूद आहे. याशिवाय दक्षिणेकडून येणारी वीजही वाढणार आहे.

- नीलेश काब्राल, पर्यावरणमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com