Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: पोलिसांच्या हाती लागेना गुन्ह्यात वापरलेला सुरा

Goa Crime News: नेसाय खून: मारियोला दहा दिवसांचा रिमांड

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: मालमत्तेच्‍या वादातून आपल्‍याच काकीचा खून करण्‍याचा आरोप असलेल्‍या पाद्रीभाट-नेसाय येथील संशयित मारियो ओलिव्‍हेरा (३४) या संशयिताला मायणा-कुडतरी पोलिसांनी मडगाव पोलिसांसमोर हजर केले असता त्‍याला दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्‍यात आली.

या खुनासाठी संशयिताने ज्‍या सुऱ्याचा वापर केला तो अजूनही पोलिसांच्‍या हाती लागला नसून पोलिस या सुऱ्याच्‍या शोधात आहेत, अशी माहिती निरीक्षक अरुण देसाई यांनी दिली.

रविवारी रात्री ही घटना घडली होती. संशयित मारियोने आपली काकी फ्‍लोेरेंटिना फर्नांडिस (५३) हिच्‍या पोटात सुरा खुपसून नंतर घटनास्‍थळाहून पळ काढला हाेता. त्‍याच्‍या मोबाईल लाेकेशनवरून माग काढत पोलिसांनी त्‍याला नंतर अटक केली होती.

पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, रविवारी रात्री संशयित मारियो आपल्‍या मित्रांसोबत एका बारमध्‍ये दारु पित बसलेला असताना फ्‍लोरेंटिना हिचा मुलगाही त्‍या बारमध्‍ये आला. \

त्‍यावेळी त्‍या दाेघांत वादही झाला होता. नंतर मारियो आपल्‍या घरी आला असता त्‍याची गाठ फ्‍लोरेंटिनाशी पडली. तिथे त्‍यांच्‍यात पुन्‍हा वाद सुरू झाल्‍यानंतर रागाच्‍या भरात त्‍याने तिच्‍या पोटात सुरा खुपसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Barge Sank: समुद्रात असलेल्या जहाजाच्या अवशेषांनी घात केला; मुरगावात लोखंडी प्लेट्सने भरलेल्या बार्जला जलसमाधी, 8 खलाशी बचावले

Shubman Gill Video: 'मी पण पाकिस्तानी फलंदाज नाही...', शुभमन गिलचं सडेतोड उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

...अन्यथा मनोहर पर्रीकरांना खोटारडे ठरवा; मंत्री माविन यांच्याविरोधात गोवा सरकार उच्च न्यायालयात जाणार का? चोडणकरांचा सवाल

Goa Live News: गणेश विसर्जनासाठी 'दृष्टी मरीन'चे 47 ठिकाणी जीवरक्षक राहणार तैनात, भक्तांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

Liquor Seized: गोवा बनावटीचे 35 लिटर मद्य जप्त! अनमोड चेकपोस्टवर कारवाई; कर्नाटकच्या चालकाला अटक

SCROLL FOR NEXT