Goa News: कितीही ध्वनी प्रदूषण झाले तरीही सागरी कासवांवर कसलाच परिणाम झाला नसल्याचे नुकतेच दिसून आले. मावळत्या वर्षात 27 डिसेंबरला एका सागरी कासवाने 98 अंडी घातली होती. त्यानंतर नवीन वर्षात 2 जानेवारीला दोन सागरी कासवाने एकाने 101 तर दुसरीने 91 अंडी घातलेली आहेत.
कासवांच्या अंड्यांची घरटी वन्य विभागाकडून आरक्षित केलेल्या जागेत सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. ही दोन्ही सागरी कासवे २ रोजी रात्री विठ्ठलदास तेंबवाडा किनारी भागात येऊन अंडी घातली.
आणि त्या अंड्यांना सुरक्षा देण्याचे काम वन कर्मचाऱ्यांनी केले. सागरी कासवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने मोरजी-आश्वे, मांद्रे हे दोन किनारे संवेदनशील घोषित केले आहेत.
या किनाऱ्यावर शांतता महत्त्वाची असते. सायंकाळी ७ नंतर दिवे पेटवण्यास निर्बंध आहेत. त्यामुळे शॅक व्यावसायिक विजेचे दिवे पेटवत नाहीत. मेणबत्ती पेटवून थोडा काळ व्यवसाय करत असतात.
मात्र, काही खासगी जमिनीतील रेस्टॉरंट, क्लब आहेत, तिथे मात्र मोठ्या प्रमाणात प्रखर दिवे पेटवले जातात. विद्युत रोषणाई केली जाते. मात्र,त्याचा कासवांवर परिणाम झाल्याचे आढळले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.