Goa Bus

 

Dainik Gomantak 

गोवा

चिखलीत प्रवासी बस ला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

बसमधील (Bus) प्रवाशांनी वेळीच बसमधून मिळेल तेथून बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने प्राणहानी टळली.

दैनिक गोमन्तक

वास्को: चिखली येथे एका प्रवासी बसला आग लागून बस आगीच्या भक्षस्थानी जळून खाक झाली. बसमधील प्रवाशांनी वेळीच बसमधून मिळेल तेथून बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने प्राणहानी टळली.

बसमधील प्रवासी भयभीत झाले व खिडकीतून तसेच दरवाजा असे मिळेल तेथून प्रवाशांनी बसमधून (Goa Bus) बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर काही महिलांनी आरडाओरड करून बसचा दरवाजा उघडला व भराभर उतरल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.सदर घटना आज रात्री पावणे आठच्या दरम्यान घडली. प्रवासी बसला आग लागल्याची वास्को अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबसहीत घटनास्थळी धाव घेतली व बसला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. आगीवर नियंत्रण आणे पर्यंत बस मधील संपूर्ण आसन व्यवस्था व इतर सामान जळून खाक झाले होते.सदर आग शाॅर्टसर्कीटमुळे लागल्याचा कयास व्यक्त करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT