Calangute Panchayat  Dainik Gomantak
गोवा

Calangute Traffic Issue: कळंगुट किनारपट्टी भागातील वाहतूक कोंडी सुटणार, पंचायतीने घेतला 'हा' निर्णय

पंचायतीकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजनाला सुरुवात

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute Traffic Issue: कळंगुट किनारपट्टी भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कळंगुट ग्रामपंचायतीने वाहतूक पोलिस व सदस्यांसह बोडको-वाडो शेजारी आज भेट देऊन संबंधित विषयाची पाहणी केली.

या पाहणीसाठी कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा, उपसरपंच गीता परब, कळंगुट वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या वेळी पत्रकारांशी बोलताना कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले की, कळंगुट रस्त्याच्या काही विशिष्ट भागावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.

नित्य होणारी वाहतूक कोंडीमुळे तो भाग अपघात प्रवण क्षेत्र देखील बनला आहे. त्यामुळेच या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय पंचायतीने घेतला आहे.

पंचायत वाहतूक कोंडीची समस्या आणि बेकायदा पार्किंग यावर देखील निर्णय घेणार असल्याचे सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले.

तसेच या भागातील ठराविक ठिकाणी पंचायत हायमास्ट दिवे लावण्याचे नियोजन करत असून हे काम आणखी 8 किंवा 10 दिवसात सुरू होईल असे सिक्वेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT