Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: आधी राहिले एकत्र; वाद झाल्याने केला खून

सत्र न्यायालयाचा निवाडा: हत्या करत रचला आत्महत्येचा बनाव, आरोपी हिरा लोहारला जन्मठेप

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime मेरशी येथील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बिसनाथ मेहर या मजुराच्या खूनप्रकरणी पणजी अतिरिक्त प्रधान सत्र न्यायालयाने आरोपी हिरा लोहार याला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा दिली.

आरोपीविरुद्ध खटल्यावेळी साक्षीदारांनी दिलेली साक्ष तसेच पुरावे त्याने गुन्हा केल्याचे सिद्ध होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने निवाड्यात नोंदवले आहेत. त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याबरोबरच 1 लाख रुपयांचा दंड सुनावला.

आरोपी हिरा लोहार व मयत बिसनाथ मेहर हे मेरशी येथील बांधकाम सुरू असलेल्या जागेतच एकत्र राहत व त्यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये वैर होते. त्यातून हा गुन्हा झाल्याची साक्ष तेथे काम करणाऱ्या काही मजुरानी पोलिसांना तसेच न्यायालयात दिली होती.

वैद्यकीय डॉक्टरांनी केलेल्या शव चिकित्सा अहवालात मयत बिसनाथ मेहर याचा खून गळा आवळून झाल्याचे स्पष्ट केले होते. या सर्व बाबी पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याने सत्र न्यायालयाने त्याला कलम ३०२ खाली जन्मठेपेची शिक्षा दिली.

15 साक्षीदारांच्या जबान्या

जुने गोवे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तो शव चिकित्सेसाठी पाठविला. या खुनाचा छडा लावताना तत्कालिन पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी केलेल्या तपासात संशयित हिरा लोहार हा मजूर गायब असल्याचे तसेच त्याचे मयत बिसनाथ याच्याबरोबर भांडण आल्याचे उघड झाल्याने त्याच दिवशी संशयिताला अटक करण्यात आली. पोलिसांनी या तपासकामावेळी 15 साक्षीदारांच्या जबान्या न्यायालयात आरोपपत्रसोबत सादर केल्या होत्या.

असा केला खून

15 जुलै 2016 रोजी रात्री 1 च्या सुमारास हिरा लोहार व बिसनाथ मेहर यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणाचे रुपांतर मारहाणीत होऊन लोहार याने बिसनाथ मेहर याचा प्लास्टिकच्या स्ट्रिपने गळा आवळला होता.

बिसनाथचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या गळाल्या बांधलेली ही स्ट्रिप तेथील बांधकामाला असलेल्या लोखंडी पट्टीला बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता.

आरोपी लोहार याने त्याला लोंबकळत ठेवून कोयत्याने त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा केल्या होत्या. या बांधकामच्या ठिकाणी मजरू आले असता त्यांना बिसनाथ हा पहिल्या मजल्यावर लोंबकळत असलेला दिसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT