Purument Fest: मडगावात पुरुमेंताच्या फेस्तला उत्साहात प्रारंभ

लोकांची गर्दी, पण खरेदी अल्प: फेस्तची पारंपरिक संकल्पना बदलल्याचे मत
Purument Fest
Purument FestDainik Gomantak
Published on
Updated on

Purument Fest मडगावात द फिस्ट ऑफ पेंटेरकोस्तच्या निमित्ताने आज पुरुमेंताच्या फेस्ताला प्रारंभ झाला. आठ दिवस चालणाऱ्या या फेस्तामध्ये सुकी मासळी, वैद्यकीय वनस्पती, मातीची भांडी, फर्निचर, सुक्या मिरच्या, सोले, आमटाण व पारंपरीक खाद्य पदार्थांचे मांड तसेच कपडे, खेळणीचे स्टॉल्स पडलेले आहेत. पहिल्या दिवशी संध्याकाळी उशिरा लोकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती.

पूर्वी प्रमाणे पुरुमेंताच्या फेस्ताला तेवढे महत्त्व राहिलेले नाही. आता सर्वच वस्तु वर्षभर उपलब्ध असल्यामुळे कोणीही पुरुमेंत (साठवून ठेवणे) करीत नाहीत. पूर्वी पावसाळ्यात मासळी किंवा सुक्या मिरच्या, कांदे, सोले वैगेरे मिळत नसे.

तसेच आताप्रमाणे कपड्याची, भांड्याची, फर्निचरची दुकाने नव्हती. त्यामुळे लोक पुरुमेताच्या फेस्तामध्ये या वस्तु विकत घेऊन संग्रह करत, असे सावियो आल्मेदा या ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.

सुकी मासळी विक्रेत्या बाईने सांगितले, की आम्ही केवळ औपचारिक म्हणून ही सुकी मासळी विकायला बसलो आहोत. पूर्वप्रमाणे आता गिऱ्हाईकच नसते. कारण सुकी मासळी आता मासळी बाजारात उपलब्ध असते.

Purument Fest
Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, ब्रेक फेल झाल्यामुळे बसची अनेक वाहनांना धडक

फेस्तची जागा बदलली

अगोदर पुरुमेंताचे फेस्त जुन्या बाजारात होली स्पिरीट चर्चच्या परिसरात भरायचे. पण आता रहदारी तसेच लोकसंख्याही वाढल्याने फेस्त दुसरीकडे हलविणे गरजेचे ठरले आहे. आता फेस्त फेरी जुन्या बाजारातील टिट्यावर भरली आहे, जिथे केवळ सुकी मासळी उपलब्ध आहे.

चणे, शेंगा, खाजे, मातीच्या भांड्याचे स्टॉल्स कोलवा रस्त्याच्या बाजुला आहेत. कपडे, सौंदर्य प्रसाधने, चप्पल, शोभेच्या वस्तु, खेळण्यांचे स्टॉल्स पार्किंग प्लाझाच्या जागेत थाटले आहेत. फर्निचर, जायंट व्हिल, अम्युजमेंट पार्क एसजीपीडीए मैदानावर आहे.

Purument Fest
Bardez News: कचऱ्याचा प्रश्‍न; बेकायदेशीर बांधकामांवर पंचायतीचे दुर्लक्ष

प्रार्थना सभेला गर्दी

जुना बाजारातील होली स्पिरिट चर्चमध्ये हे फिस्ट साजरे करण्यात आले. त्यानिमित्त पहाटे पाच वाजल्यापासून प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य प्रार्थना सभा 9.30 वाजता व शेवटची प्रार्थना सभा 11.30 वाजता चर्चचे रेव्ह फा. आमांदियो वालादारीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. या प्रार्थना सभेला ख्रिस्ती बांधवांची मोठी उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com