Goa Calangute police detaining transgender 'Bobby' Dainik gomantak
गोवा

Gomantak Special Report : वेश्याव्यवसायात वाढले तृतीयपंथीयांचे प्रमाण!

‘जिगोलों’चेही बस्तान : गोवा ठरतेय नंदनवन; गिऱ्हाईक मिळत नसल्याने रस्‍त्‍यावरच भांडणे

दैनिक गोमन्तक डिजिटल

Gomantak Special Report : राज्‍यात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायात झपाट्याने बदल होत चालले आहेत. या व्यवसायात आता महिलांप्रमाणेच तृतीयपंथी आणि नरवेश्यांचे (जिगोलो) प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्‍यामुळे सध्या गोवा हे अशा व्यावसायिकांसाठी नंदनवनच ठरले आहे.

कळंगुट परिसरात काही तृतीयपंथीयांना ‘बॉबी’ नामक अन्य एका तृतीयपंथीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे.

या व्यवसायातील पीडितांना बाहेर काढण्यासाठी मागची 30 वर्षे गोव्यात सक्रिय असलेल्या ‘अर्ज’ (अन्‍याय रहित जिंदगी) या संघटनेचे प्रमुख अरुण पांडे यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले, गोव्यात नेमके किती तृतीयपंथी आणि जिगोलो वेश्याव्यवसायात आहेत याची नेमकी आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध नसली तरी या दोन्ही प्रकारचे किमान 500 जण तरी कार्यरत असावेत.

...तर म्‍हापशाची स्‍थिती बायणासारखी!

एका अंदाजाप्रमाणे सध्या गोव्यात वेश्याव्यवसायात 7000 पेक्षा जास्त महिला, पुरुष आणि तृतीयपंथी सक्रिय आहेत. यातील बहुतेकांना कॅसिनो, डान्सबार आणि हॉटेल्समध्ये काम देण्याचे आमिष दाखवून गोव्यात आणले जाते आणि नंतर या व्यवसायात ढकलले जाते.

उत्तर गोव्यात हे प्रमाण जास्त आहे. म्हापसा आणि वास्को ही दोन शहरे झपाट्याने या व्यावसायिकांच्या कचाट्यात येऊ लागली आहेत. म्हापशात ग्राहक मिळत नसल्याने वेश्यांची भररस्त्यावर भांडणे होत आहेत. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर म्हापशाला बायणासारखी कळा येण्यास वेळ लागणार नाही, असेही पांडे यांनी सांगितले.

500 पेक्षा अधिक वेबसाईट्स कार्यरत

गोव्यात सध्या ऑनलाईन वेश्याव्यवसाय फोफावला आहे. यासाठी राज्यात 500 पेक्षा अधिक वेबसाईट्स सक्रिय आहेत. याद्वारे मुली पुरविण्याचे पद्धतशीर रॅकेट कार्यरत आहे. एका मुलीसाठी एका रात्रीला ग्राहकाकडून 10 ते 15 हजार रुपये आकारले जातात.

मात्र त्यातील त्‍या मुलीला त्यातील फक्त एक किंवा दीड हजार रुपयेच मिळतात. आता गोव्यात ऑनलाईनबरोबर रस्त्यावरील वेश्याव्यवसायही वाढला आहे. समुद्रकिनारे आणि प्रमुख शहरांमध्‍ये दलाल उघडपणे ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

"कोरोना महामारीपूर्वी वेश्‍‍याव्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यास गोवा पोलिस तत्परता दाखवत होते. मात्र मागच्या तीन वर्षांत पोलिसांनी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. त्‍यामुळे यापूर्वी कोलकाता, मुंबई, दिल्ली येथे अशा धंद्यात असलेले हे तृतीयपंथी आणि नरवेश्‍‍या (जिगोलो) व्यावसायिक गोव्यात आपले बस्तान बसवत आहेत."

- अरुण पांडे, ‘अर्ज’चे प्रमुख

कोरोनानंतर आलाय व्‍यवसायाला ऊत

तृतीयपंथी व जिगोलो या दोघांचेही ग्राहक एकाच पठडीत मोडत असल्याने त्यांच्‍यात नेहमीच भांडणे होत असतात. मागच्या चार वर्षांत हे प्रमाण वाढले आहे. पूर्वी असे धंदेवाले हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच होते. मात्र कोविडनंतर हे प्रमाण नियंत्रणाबाहेर गेले आहे, असे पांडे म्‍हणाले.

कोविडपूर्वी असा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यास गोवा पोलिस तत्परता दाखवत होते. मात्र मागच्या तीन वर्षांत पोलिसांनी या प्रकाराकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. त्‍यामुळे यापूर्वी कोलकाता, मुंबई, दिल्ली येथे अशा धंद्यात असलेले हे तृतीयपंथी आणि नरवेश्‍‍या व्यावसायिक गोव्यात आपले बस्तान मांडत आहेत.

या व्यावसायिकांची संख्या जास्त आणि त्यामानाने गिऱ्हाईक कमी असल्याने ग्राहक मिळविण्यासाठी त्यांच्यामध्ये भांडणे वाढत आहेत, असेही पांडे म्‍हणाले.

पोलिसांच्‍या कामगिरीला उतरती कळा

वेश्‍‍याव्यवसायात असलेल्या एजंट लोकांवर पूर्वी पोलिस कारवाई करून पीडित युवतींची सुटका करायचे. 2020 पर्यंत दरवर्षी सरासरी 100 मुलींची सुटका केली जात होती. मात्र 2021 मध्‍ये हे प्रमाण 38 वर आले तर 2022 साली फक्त 19 मुलींचीच सुटका झाली आहे. 2023 मध्ये अजून एकाही पीडित युवतीची सुटका झाल्याची नोंद नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT