Goa Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Ferryboat Service: फेरीबोटप्रकरणी सरकार नमले

Ferryboat Service: शुल्कवाढ अधिसूचना मागे: दुचाकींना मोफत प्रवास; जुनेच दर कायम

दैनिक गोमन्तक

Ferryboat Service: राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या जलमार्गावरील फेरीबोट सेवा तिकीट शुल्कात वाढ करण्यात आलेली अधिसूचना मागे घेऊन जुन्याच तिकीट शुल्कासंदर्भातची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ही सूचना बंदर कप्तान व नदी परिवहन खात्याचे संयुक्त सचिव विकास गावणेकर यांनी काढली आहे. या अधिसूचनेनुसार उद्या 16 नोव्हेंबरपासून दुचाकीस्वारांना मोफत फेरीसेवा करण्यात आली असून इतर वाहनांसाठीचे जुनेच दर कायम ठेवण्यात आले आहेत.

पोंबुर्फा - चोडण, जुने गोवे - पिएदाद, कामुर्ली - तुये, नार्वे - दिवाडी, कुंभारजुवे - गवंडाळी या जलमार्गावरील फेरीसेवेसाठी तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी प्रत्येक फेरीसाठी ७ रुपये शुल्क, तर प्रतिमाह ३१५ रुपये पास ठेवण्यात आला आहे.

मध्यम व्यावसायिक व प्रवासी वाहनांसाठी प्रत्येक फेरीसाठी ७ रुपये, १० टनाखालील अवजड वाहनांसाठी प्रत्येक फेरीसाठी 20 रुपये, तर मालवाहू वाहनांसाठी २० रुपये प्रति टन असे शुल्क ठरवण्यात आले आहे. पास असलेल्या वाहनधारकांना अमर्यादित सेवेचा लाभ घेता येणार आहे.

वळवई - सुर्ला - मायणा, पणजी - बेती, तोलतो - धावजी, केरी - तेरेखोल, रायबंदर - चोडण, सांपेद्र - दिवाडी, वाशी - अंबोई, सारमानस - टोंक, राय - शिरोडा व आडपई - रासई या जलमार्गावरील फेरीसेवेसाठी तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी प्रत्येक फेरीसाठी १० रुपये शुल्क, तर प्रतिमाह 450 रुपये पास ठरवण्यात आला आहे.

मध्यम व्यावसायिक व प्रवासी वाहनांसाठी प्रत्येक फेरीसाठी 20 रुपये, 10 टनाखालील अवजड वाहनांसाठी 22 रुपये, तर मालवाहू वाहनांसाठी 20 रुपये प्रत्येक टनामागे शुल्क आकारले जाणार आहे. रासई - दुर्भाट या जलमार्गावरील फेरीबोट सेवेसाठी तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी प्रत्येक फेरीसाठी 14 रुपये व प्रतिमाह 650 रुपये पास शुल्क ठेवण्यात आले आहे.

मध्यम व्यावसायिक व प्रवासी वाहनांसाठी प्रत्येक फेरीसाठी 20 रुपये, 10 टनाखालील अवजड वाहनांसाठी 33 रुपये, तर मालवाहू वाहनांसाठी प्रत्येक टनामागे 20 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. मडकई - कुठ्ठाळी जलमार्गावरील फेरीबोट सेवेसाठी तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी प्रत्येक फेरीसाठी 27 रुपये व प्रतिमाह 1215 रुपये पास शुल्क ठेवण्यात आले आहे. मध्यम व्यावसायिक व प्रवासी वाहनांसाठी प्रत्येक फेरीसाठी 43 रुपये, 10 टनाखालील अवजड वाहनांना तसेच मालवाहू वाहनांना या फेरीबोटीचा वापर करता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT