Mopa International Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: PM नरेंद्र मोदींच्या हस्ते मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे होणार उद्घाटन..

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 डिसेंबरनंतर नव्याने बांधलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 डिसेंबरनंतर नव्याने बांधलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत; मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

(Mopa International Airport)

मोपा विमानतळावर पहिले विमान उतरले. मुंबईहून निघालेले इंडिगो कंपनीचे ‘6-इ-9001’ हे विमान कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना घेऊन निघाले होते. मोपाची धावपट्टी ही विमानांचे टेक ऑफ करण्यासाठी योग्य आहे की नाही याबाबतची चाचणी जुलै महिन्यात झाली होती. तेव्हा मोपाच्या धावपट्टीवरून विमानाने यशस्वीपणे टेक ऑफ केले होते. त्यानंतर आता विमानाचे यशस्वी लँडिंगही झाले आहे. ही चाचणी नागरी वाहतूक संचानलयाच्या देखरेखीखाली पार पडली.

पेडणे तालुक्यातील ‘मोपा’चे काम 95 टक्क्यांहून पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची धावपट्टी तसेच अन्य बांधकाम देखील पूर्णतत्वाकडे पोहचले आहे. या विमानतळावरील धावपट्टी ही विमान उतरवण्यासाठी योग्य आहे का? त्यात कुठलीही तांत्रिक अडचण तर नाही ना याची चाचणी घेण्यात आली. ‘मोपा’वर हे पहिले विमान उतरताच तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमान उतरलेल्या ठिकाणी धाव घेऊन अधिकाऱ्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवली. यावेळी अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या ‘रन-वे’ची, तसेच विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

या पाहणीचा अहवाल दिल्यानंतर दिल्ली विमानतळ प्राधिकरणाकडून मोपा विमानतळाला विमान उड्डाण आणि लँडिंग करण्यासाठी परवाने मिळणार आहेत. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

देशात 17 ठिकाणी सरळ उड्डाण

मोपा विमानतळ सुरू झाल्यास पहिल्या टप्प्यात देशातील 17 ठिकाणी सरळ उड्डाण करता येतील. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळूर, नागपूर, हैदराबाद, चेन्नई, कोचीन, कोलकता, लखनऊ ,चंदीगड, अहमदाबाद आदींचा समावेश आहे. तर या विमानतळावरून सरळ 12 आंतरराष्ट्रीय ठिकाणांवर विमान उड्डाण होईल. यात अमेरिका, इंग्लंड, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंग्लंड, रशिया आणि मध्य आशियाई व युरोपमधील काही देश यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SCROLL FOR NEXT