Elvis Gomes | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : जप्त केलेल्या होड्या सोडण्यात ‘पाडलोस्कर’ नाव आले पुढे; काँग्रेसचा आरोप

परवानगी न घेता होड्या मालकाकडे सुपूर्द

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Congress : हॉटेल व्यावसायिकांकडून कथित खंडणी गोळा केल्याच्या प्रकरणात जी नावे पुढे आली आहेत, त्यापैकी पाडलोस्कर हे आडनाव आता आणखी एका प्रकणात पुढे आले आहे.

बंदर कप्तान खात्याने जप्त केलेल्या होड्या काही रक्कम आकारून मूळ मालकाला देण्यात ‘पाडलोस्कर'' आडनावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याची माहिती काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी दिली. त्यामुळे खंडणी प्रकरणात ‘पाडलोस्कर'' आडनाव पुढे आल्यामुळे आता ती हीच व्यक्ती आहे काय? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

बंदर कप्तान खात्याने रेतीच्या बेकायदा व्यवसायात जप्त केलेल्या होड्यांपैकी नुकत्याच नऊ होड्या काही रक्कम आकारून सोडण्यात आल्या. त्यामुळे याप्रकरणी शहानिशा करण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ खात्यातील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते.

परंतु सध्या बंदर कप्तान खात्याचा प्रभारी पदभार असलेले अधिकारी, त्याशिवाय मरीन इनिस्पेक्टरही जागेवर नसल्याचे आढळून आले. गोम्स म्हणाले, बंदर कप्तान खात्याचे कार्यालयही लवकरच स्थलांतर होऊन ते कॅसिनो चालकांच्या ताब्यात जाणार आहे.

खात्यात कोणताही अधिकारी उपस्थित नसतो. मुख्यमंत्री या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी या खात्यावर लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे, असे गोम्स म्हणाले.

माजी आमदार लवू मामलेदार म्हणाले, राज्य सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार सुरूच आहे.

होडीमागे एक लाख रुपये!

बंदर कप्तान खात्याने मागील काळात ज्या काही होड्या जप्त केल्या होत्या, त्या सोडण्यासाठी प्रत्येक होडीमागे एक लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप गोम्स यांनी केला.

ते म्हणाले, अशाप्रकारे नऊ होड्या सोडण्यात आलेल्या आहेत. या होड्या सोडण्यामागे ‘पाडलोस्कर'' या आडनावाची व्यक्ती असल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT