Vishwajit Rane In Sanguem
Vishwajit Rane In SanguemDainik Gomantak

Prashasan Tumchya Daari : लोकं म्‍हणतात, प्रशासन दरदिवशी यावे दारी!

मंत्र्यांचे तालुका दौरे : आज अधिकारी पंचायतींत
Published on

लोकांच्‍या विविध समस्‍या होत्‍या, त्‍या सुटण्‍याच्‍या दृष्‍टीने आजचा दिवस अनेकांसाठी सुखद ठरला. बारा मंत्री हे बारा तालुक्‍यांत प्रशासन लोकांच्‍या दारी घेऊन पोहोचले. समस्‍यांपासून नागरी विकासापर्यंत अनेक प्रश्‍‍नांवर लोकांनी गाऱ्हाणी मांडली आणि त्‍यावर तोडगेही निघाले. प्रशासन दरदिवशी यावे दारी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्‍यक्‍त केली.

याच अभियानांतर्गत शनिवारी 191 पंचायतींमध्ये सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वयंपूर्ण मित्र सकाळी 10 ते 1 या वेळेत जनतेसाठी उपस्‍थित राहतील.

Vishwajit Rane In Sanguem
Goa Assembly Budget Session : चार दिवसीय अधिवेशनात तब्बल 803 प्रश्‍न; 28 मार्चला अर्थसंकल्प

अशा प्रकारचे अभियान राबवणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य असून, शुक्रवारी राज्यातल्या सर्व मंत्र्यांनी तालुक्याच्या ठिकाणी शेकडो नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यावरच्या उपाययोजनांसाठी आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 4 वर्षे आणि केंद्रातील मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘प्रशासन तुमच्या दारी’ हे अभियान हाती घेण्‍यात आले आहे.

बंध अधिक दृढ

"लोकांना चांगले प्रशासन देण्‍यासाठी राज्‍य सरकार सर्वतोपरी प्रयत्‍न करत आहे. ‘प्रशासन तुमच्‍या दारी’ हा त्‍याचाच एक भाग आहे. राज्‍य सरकार आणि नागरिकांचा बंध अधिक दृढ होत आहे."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com