Bicholim Accident Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident: डिचोली परिसरात फेब्रुवारी महिना ठरला ‘कर्दनकाळ’

सातजणांचे बळी ः भीषण रस्ता अपघातांच्या घटना

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Accident यंदाचा फेब्रुवारी महिना डिचोलीसाठी घातक ठरला असून या एकाच महिन्यात लहानसहान मिळून सात ते आठ अपघात घडले. त्यात तीन भीषण रस्ता अपघात घडले. या तीन भीषण रस्ता अपघातात दोन महिला मिळून सात जणांचे बळी गेले आहेत. या अपघातांमुळे साळ, हरवळेसह मेणकूरे गावांवर तर मोठी शोककळा पसरली.

आठ दिवसांच्या आत साळ गावातील सासरे-सूनेसह अन्य एक मिळून तिघेजण तर हरवळे येथील पती-पत्नी ठार झाली. मेणकूरे येथेही एकजण ठार झाला. साखळी, सर्वणसह अन्य भागातही भयानक रस्ता अपघात घडले, मात्र या अपघातांत जीवितहानी मात्र टळली.

दोन दिवसांपूर्वीच गेल्या रविवारी मध्यरात्री डिचोली-साखळी रस्त्यावर कार पलटून झालेल्या अपघातात दाम्पत्य सुदैवाने बचावले. हरवळे येथील अपघातात दोन वर्षांचे बालकही सुखरूप बचावले.

क्रूर काळाचा घाला

गेल्या फेब्रूवारी महिन्याच्या 9 तारखेला अस्नोडा-दोडामार्ग रस्त्यावरील नानोडा येथे कदंबच्या प्रवासी बसला कारची धडक बसल्याने साळ येथील महादेव राऊत आणि सोनाली राऊत हे सासरे-सून ठार झाले. महादेव राऊत हे जागीच तर सोनाली यांना इस्पितळात मरण आले.

या अपघातातील जखमी कारचालक आशिष परब याचा सहा दिवसांनी इस्पितळात मृत्यू झाला. नानोडा येथील या भीषण अपघाताला आठ दिवस उलटण्या आधीच 15 फेब्रुवारी रोजी हरवळे-साखळी येथे आणखी एक भीषण अपघात घडला.

ट्रकची स्कूटरला धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात हरवळे येथील किशोर नाईक आणि अर्चना नाईक हे दाम्पत्य जागीच ठार झाले. तर फेब्रूवारी रोजी मेणकूरे येथे झालेल्या स्वयंअपघातात मेणकूरे येथीलच दुचाकीस्वार सतीश शेट्ये हा युवक ठार झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: 'Viral Audio Tape' मागे बदनामी करण्याचा हेतू! आमदार गावकरांनी केली चौकशीची मागणी

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Professional League: चुरशीच्या लढतीत FC Goaचा पराभव! कुठ्ठाळी व्हिलेजर्सने दिली 3-2 अशी मात

Ranji Trophy: गोव्याला दुसऱ्याच दिवशी दणदणीत विजयाची संधी! 'तेंडुलकर'च्या पाच विकेटनंतर 'कश्यप', 'स्नेहल' यांची शतके

SCROLL FOR NEXT