Valpoi News
Valpoi NewsDainik Gomantak

Valpoi News: विद्यार्थ्यांनी यशासाठी ध्येय निश्‍चित करावे- दिव्या राणे

गुणवंतांचा गौरव : ठाणेत देसाई विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
Published on

विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा त्रिवेणी संगम व्हावा लागतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ध्येयानुसार कष्ट केल्यास यश निश्चितच मिळेल, असे वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

कै. हिरोजीराव बाबूराव देसाई सरकारी माध्यमिक विद्यालय ठाणेच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, डोगुर्ली ठाणे पंचायतीच्या सरपंच सरिता गावकर, उपसरपंच तनया गांवकर, निलेश परिवार, सुरेश आयकर, विनायक गावस, सुचिता गावकर, सुभाष गावकर, एस. एम.सी अध्यक्ष फटगो गावकर, उपाध्यक्ष पांडुरंग गावकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष अनील देसाई, उत्तम गावकर, गोपाळ नाईक, सुहास नाईक, सुंदर सावंत, स्मिता कदम, शंकुतला सावर्शेकर, गुरुदास गावस, ज्येष्ठ शिक्षक गणेश गावडे आणि मुख्याध्यापक काशिनाथ नाईक उपस्थित होते.

Valpoi News
Goa Electricity Department: थकबाकीदारांनो, 31 मार्चपर्यंत वीजबील भरा - वीजमंत्री ढवळीकरांची सूचना

डॉ. राणे म्हणाल्या, प्राथमिक शिक्षणच आयुष्याला कलाटणी देत असते. आज सत्तरीतून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. सातत्याने गेली तीन वर्षे विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के दिल्याने विद्यालयाचे, मुख्यद्यापकाचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.

Valpoi News
Subhash PhalDesai: सांगे मतदारसंघाचा विकास हेच ध्‍येय- सुभाष फळदेसाई

ठाणे हायस्कूल आणि प्राथमिक शाळा यांची पी. एमश्री अंतर्गत सत्तरीतील मॉडेल स्कूल म्हणून निवड झाल्याबद्दल त्यानी अभिनंदन केले. देवयानी गावस, सरपंच सरिता गावकर, पाडूरंग गावकर याचीही भाषणे झाली.

मुख्याध्यापक काशिनाथ नाईक म्हणाले, शाळां बंद पडता कामा नये, गावची शाळा, विद्यालये हे गावचे वैभव आहे, त्याचा सर्वागिण विकास करण्याचे काम शाळा व्यवस्थापन समितीचे व पालकांचे व ग्रामस्थांचे असते.

मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन तेजा नाईक, विशारद वेळुस्कर, मिनाक्षी गावस, भारती देसाई, विजया नाईक यांनी केले. मिराबाई म्हाबरे, आणि साईश नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com