FC Goa Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी उद्या भिडणार; प्रशिक्षक मार्केझ म्हणाले...

FC Goa Vs Hyderabad FC: शुक्रवारी (ता. 5) फातोर्डा येथे होणाऱ्या सामन्यात एफसी गोवास विजयाच्या पूर्ण तीन गुणांची नामी संधी आहे, तरीही यजमान संघाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्यास तयार नाहीत.

किशोर पेटकर

Indian Super League: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील हैदराबाद एफसीची निराशाजनक कामगिरी पाहता शुक्रवारी (ता. 5) फातोर्डा येथे होणाऱ्या सामन्यात एफसी गोवास विजयाच्या पूर्ण तीन गुणांची नामी संधी आहे, तरीही यजमान संघाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्यास तयार नाहीत.

दरम्यान, एफसी गोवा सध्या 19 सामन्यांतून 36 गुण मिळवून गुणतक्त्यात चौथ्या स्थानी आहे. त्यांना लीग शिल्ड जिंकण्याची खूपच कमी संधी आहे. बाकी तिन्ही सामने जिंकणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. तुलनेत हैदराबाद एफसीविरुद्धचा शुक्रवारचा सामना सोपा आहे, मात्र 9 एप्रिल रोजी जमशेदपूर एफसीविरुद्ध (अवे मैदानावर), तर 14 एप्रिल रोजी चेन्नईयीन एफसीविरुद्ध (होम मैदानावर) एफसी गोवा संघर्ष करताना दिसेल.

अशा परिस्थिती फातोर्ड्यात शुक्रवारी पूर्ण तीन गुण प्राप्त करुन एफसी गोवा गुणतक्त्यात प्रत्येकी 39 गुण असलेल्या ओडिशा एफसी आणि मोहन बागानला गाठण्यासाठी प्रयत्नशील असेल. सध्या मुंबई सिटी 44 गुणांसह अग्रस्थानी आहे. थांगबोई सिंगटो यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबाद एफसीला 20 पैकी 14 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. अवघ्या आठ गुणांसह ते शेवटच्या बाराव्या क्रमांकावर आहेत. एकमेव विजय त्यांनी चेन्नईयीन एफसीविरुद्ध नोंदवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT