मीनाक्षी लेखी Dainik Gomantak
गोवा

गोव्यात शनिवारपासून ‘द लक्झरी’ परिषद

रितू बेरी: हिल्टन रिसॉर्टमध्ये आयोजन

दैनिक गोमन्तक

पणजी: भारताचा गौरव वाढवणाऱ्या ब्रँडना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच जागतिक पातळीवर त्याच्या प्रदर्शनासाठी व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी पर्यटन व कौशल्य मंत्रालयाच्या सहकार्याने पार्कोजतर्फे दोन दिवशीय ‘द लक्झरी’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद 26 व 27 रोजी हिल्टन रिसॉर्ट येथे होणार असून त्याचे उद्‍घाटन केंद्रीय सांस्कृतिक व विदेशी व्यवहार मंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते होणार आहे. ‘द लक्झरी’ लीगच्या संस्थापिका रितू बेरी म्हणाल्या, 26 रोजी या परिषदेचे संध्याकाळी 5 वा. उद्‍घाटन होणार आहे.

सांस्कृतिक वारसा ब्रँडिंगसाठी या परिषदद्वारे व्यासपीठ करण्यात देण्यात येत आहे. भारती कला, कारागिरीला अधिक प्रोत्साहन देण्यात येणार असून समविचारी लोक, जागतिक विचारवंत व सरकार यांच्यात संवादाच्या माध्यमातून वैचारिक देवाण - घेवाण करण्याचा या परिषदेमागे उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या.

यंदाच्या या परिषदेच्या उपक्रमात सौंदर्य, वस्त्रप्रावरणे, असेसरीज व विविध क्षेत्रातील जागतिक पातळीवरील ब्रँड सहभागी होत आहेत. या उपक्रमाला केंद्रीय पर्यटन मंत्रालय व केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता यांचेही सहकार्य लाभले आहे, अशी त्यांनी माहिती दिली. खादी हे फेब्रिक लक्झरी असून देशातील हातमागाचे कापड आहे. ते देशाचे राष्ट्रीय फेब्रिक आहे. द लक्झरीचा अर्थ विविध कला व उद्योजकतामध्ये असलेली बुद्धिमत्ता व कौशल्य असून तो लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. जागतिक पातळीवर बदलते आयाम, नवी परिभाषा, पुनर्कल्पना यावर चर्चा व संवाद या दोन दिवशीय परिषदेत केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT