अंदाज ठरला खरा, गोव्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुढील 24 तासांत केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांत हलका ते मध्यम, मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
Goa Weather Updates
Goa Weather UpdatesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: वातावरणातील बदलामुळे आजही गोव्याच्या काही भागात मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेद्वारे (IMD) व्यक्त केली आहे. आज राज्यातील विविध भागात पाऊस पडेल, असा अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. तो खराही ठरला. 23 मार्च रोजी राज्यातील विविध भागात पावसाच्या सरी बरसल्या. म्हापसा येथे 2 मि.मी. तर सर्वाधिक पाऊस वाळपई व साखळी येथे अनुक्रमे 17 व 18 मि.मी. पावसाची नोंद झाली. (Goa Weather Updates)

दरम्यान उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये पारा झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती अशी आहे की, सकाळपासून तापमानात वाढ होण्याबरोबरच दमटपणा जाणवू लागला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, आज म्हणजेच देखील उत्तर आणि मध्य भारताच्या काही भागात तापमानात वाढ होऊ शकते. IMD ने सौराष्ट्र-कच्छी, गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे.

Goa Weather Updates
Weather Updates: गोवेकरांना उन्हाळ्याची झळ बसणार; हवामान खात्याचा अंदाज

येथे पाऊस पडेल

हवामान खात्यानुसार, पुढील 24 तासांत केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांत हलका ते मध्यम, मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. याशिवाय ईशान्य भारत आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात चांगला पाऊस पडू शकतो.

Goa Weather Updates
Goa Weather Updates: राज्यात आज, उद्या पावसाची शक्यता

दिल्लीचे हवामान

आज राजधानी दिल्लीत हवामान स्वच्छ राहील. मात्र दिवसभर जोरदार वारे वाहतील. आज दिल्लीचे किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. चंदीगडचे किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहील. येथे हवामान स्वच्छ असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com