Digambar Kamat
Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

भाजपमुळं प्रत्येक नागरिकाचे जीवन असह्य झालं; दिगंबर कामत

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगावचे आमदार तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी कोणताही विकास मडगाववासीयांसाठी केला नसल्याचा आरोप विरोधी उमेदवाराकडून करण्यात येत आहे. याचे आज खंडन करताना देशातील हेलीपेडसहित सज्ज असलेले उच्च दर्जाचे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या मुख्यमंत्री काळात बांधले गेले असल्याचे मडगावातील काँग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी आके येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेवेळी व्यक्त केले.

ही सभा आके येथील जागेश्वेर मंदिर जवळ आयोजित करण्यात आली होती यावेळी महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख, मडगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, स्थानिक नगरसेविका लता पेडणेकर, प्रभाग 20 चे नगरसेवक दामोदर शिरोडकर माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना कामत यांनी सांगितले की, दक्षिण गोवा (goa) जिल्हाधिकारी हॉस्पिटलची स्थापना आपण मुख्यमंत्री असल्याच्या काळात कऱण्यात आली होती. हा आत्त्यावश्यक्य प्रकल्प प्रकल्प पुढे रेटण्याचे सोडून भाजप सरकारने मांडवी नदीवरील पूल बांधण्यात प्राधान्य दिले आणि कोविड संसर्गाचे राज्यात आगमन झाले तेव्हा घाई गडबडीत हा प्रकल्प पूर्ण करून उपयोगात आणला.

हे सरकार (Government) सामान्य लोकांचे हित जपणारे नसून या सरकारला खाली खेचायला हवे असल्याचे कामत यांनी सांगितले गेल्या निवडणुकीत मला 12 हजार मते मिळाली होती या निबडणुकीत हा टप्पा 15 हजार मतांच्या आसपास नेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायला केले.

महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि देशात इंधन दरवाढीचा फटका सामान्य जनतेला बसला आहे घरगुती गॅस दरवाढ , पेट्रोल दरवाढ , डिजल दरवाढ , आवश्यक वस्तूंचे वाढलेले दर यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाचे जीवन असह्य झाले आहे आणि हे सर्व भाजप (BJP) सरकारच्या काळात घडले आहे. राज्यातील सरकार कोव्हिडच्या दिवसात जनतेला ओक्सिजन पुरवठा करू शकली नाही ही लाजस्पद गोष्ट असल्याचे शेख यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT