Miramar  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्यातील 'या' समुद्रकिनारी जाणवतोय प्राथमिक सुविधांचा अभाव, पर्यटकांमधून नाराजी व्यक्त...

मिरामार समुद्र किनारी पर्यटकांना चेंजिंग रूम नसल्याने त्यांचा हिरमोड होतोय.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरु असून देश-विदेशातल्या पर्यटकांची पाऊलं गोव्याकडे वळू लागली आहेत. गोवा सरकार देखील राज्यातील पर्यटन व्यवसाय बहरावा, त्याला चालना मिळावी यासाठी नवनवीन धोरणं राबवत आहे.

असं असलं तरी राजधानी पणजी नजीकच्या मिरामार समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळत नसल्याचे समोर आलंय.

मिरामार समुद्र किनारी मोबाईल शौचालये, दिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा प्राथमिक सुविधा नसल्याने येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होतेय.

समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चेंजिंग रूम नसल्याने त्यांचा हिरमोड होतोय. तसेच रात्रीच्या वेळी मिरामार समुद्र किनाऱ्यावरील हायमास्ट बंद असलेले पर्यटकांनी सांगितलं आहे.

गोवा सरकार एकीकडे राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असताना मिरामारसारख्या समुद्र किनाऱ्यावर अद्याप प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT