Shivani and His Father Dainik Gomantak
गोवा

Shivani Case: उपजिल्हाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सोमवारपर्यंत शक्‍य!

Shivani Case: वास्‍को जळीतकांड : शेजाऱ्यांच्या जबान्या नोंद

दैनिक गोमन्तक

Shivani Case: शिवानी राजवत आणि तिची आई जयदेवी चौहान यांच्‍या दुहेरी जळीत मृत्‍यूप्रकरणी मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी हाती घेतलेली चौकशी जवळजवळ पूर्ण होत आली आहे. येत्‍या सोमवारपर्यंत ते आपला अहवाल सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दि. 18 नोव्हेंबर रोजी वास्कोतील राहत्‍या फ्‍लॅटमध्‍ये गॅसगळती होऊन झालेल्‍या स्फोटात शिवानी आणि जयदेवी यांचा मृत्यू झाला होता. येत्या सोमवारी त्यास एक महिना पूर्ण होणार आहे. अशा प्रकरणांत उपजिल्हाधिकारी जी चौकशी करतात, ती एका महिन्यात पूर्ण करणे कायद्याने बंधनकारक आहे.

शिवानीचा भाऊ शुभमसिंह याने या प्रकरणी वास्‍को पोलिसांत रितसर तक्रार दाखल केल्‍यानंतर चौकशीला वेग आला आहे. आपली बहीण आणि आईचा नौदलात अधिकारी म्हणून काम करणारा आपला भावोजी अनुराग याने सुनियोजित कट रचून खून केल्याचा आरोप त्याने केला आहे. आपल्या बहिणीचा

सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ केला जात होता असेही त्याने तक्रारीत म्हटले आहे. दरम्‍यान, यापूर्वी पोलिसांनी शिवानीचा पती अनुराग, सासू साधनासिंह राजवत आणि नवऱ्याचा मावसा रामवरणसिंह यांच्‍या जबान्‍या घेतल्‍या आहेत.

उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी आज बुधवारी राजवत यांच्‍या शेजाऱ्यांची जबानी नोंद करून घेतली. ज्या फ्लॅटमध्ये ही दुर्घटना घडली होती, त्या फ्लॅटचे मालक प्रेमानंद शेट यांची काल जबानी घेतली होती. या फ्लॅटमध्ये राहायला आल्‍यानंतर शिवानी आणि तिचा पती अनुराग राजवत यांच्यात नेहमीच खटके उडायचे असे सांगण्यात येत आहे. उपजिल्हाधिकारी करमली हे त्‍याबाबत खात्री करून घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SCROLL FOR NEXT