GIDC Dainik Gomantak
गोवा

GIDC: ‘इन्व्हेस्ट गोवा 2024’ला प्रतिसाद !

GIDC: आजपासून प्रारंभ: 400 हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग शक्य

दैनिक गोमन्तक

GIDC: राज्यात सोमवार दि. 29 जानेवारी रोजी होणाऱ्या इन्व्हेस्ट गोवा 2024 परिषदेबाबत सर्वांचीच उत्सुकता वाढली असून, या परिषदेमध्ये 400 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. गोवा-आयडीसीचे एमडी प्रविमल अभिषेक, आयएएस यांनी सांगितले, की जवळपास 350-400प्रतिनिधींनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

पुढील 2-3 दिवसांत सहभागींची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. तथापि, 400 व्यक्ती आसनक्षमतेनुसार, प्राप्त नोंदणी अर्जांमधून व्यवसायांशी संबंधित आणि प्रभावशाली सहभागीच्या निवडीची अंतिम प्रक्रिया सुरू आहे.

गोवा औद्योगिक विकास महामंडळ आणि भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने इन्व्हेस्ट गोवा 2024 परिषदेचे आयोजन करण्यात येत असून सीआयआय ही संस्था राष्ट्रीय भागीदार म्हणून काम करत आहे.

लॉजिस्टिक आणि वेअरहाउसिंग, वैद्यकीय उपकरणे, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, रिअल इस्टेट आणि मनोरंजन व्यवसाय तसेच माहिती तंत्रज्ञान आणि आयटी-सक्षमित सेवा (आयटीईएस) यासह विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व या शिखर परिषदेत असल्याची बाब व्यवस्थापकीय संचालकांनी अधोरेखित केली.

शिखर परिषदेचा भर हा औद्योगिक वसाहतींवर असल्याचे नमूद करत त्यांनी या क्षेत्रांमधील संभाव्य गुंतवणूक संधींबद्दल आशावाद व्यक्त केला. रिअल इस्टेट क्षेत्राच्या सहभागाबाबत अभिषेक यांनी सांगितले,की गुंतवणूकदारांच्या पसंतींत बदल झाला आहे. भूसंपादन, बांधकाम आणि आवश्यक परवानग्या मिळविणेसंबंधी या उद्योगांपुढील आव्हानांवरही प्रकाश टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT