Mangrove trees Dainik Gomantak
गोवा

Mangrove Trees: तेरेखोल नदीकिनारी खारफुटीची झाडे लावण्यास उगवेवासियांचा पुढाकार

बेकायदेशीर रेती उत्खनन करून मोठ्या प्रमाणात शेतजमिनी नदीने गिळंकृत करून नदीपात्र मोठे झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

तेरेखोल नदी पात्रात रेती व्यवसायामुळे ठप्प झालेला शेती व्यवसाय आणि नदी किनारा राखण्यासाठी उगवे गावातील शेतकरी आणि नागरिकांनी रविवारी नदीकिनारी खारफुटी झाडांची लागवड करून एकप्रकारे निसर्गाचे संवर्धन आणि नदीसंवर्धनाचा संदेश दिला आहे.

गेली अनेक वर्षे या भागात बेकायदेशीर रेती उत्खनन करून मोठ्या प्रमाणात शेतजमिनी नदीने गिळंकृत करून नदीपात्र मोठे झाले आहे. अनेकांची नारळांची झाडे आणि इतर बागायतीही नदीने गिळंकृत केली. अनेक झाडांना यापूर्वी जलसमाधी मिळालेली आहे.याचं कारण म्हणजे गेली अनेक वर्षे या भागात बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन केले जाते. वारंवार तक्रारी करूनही रेती व्यवसायावर नियंत्रण आणण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी दिली.

रविवारी सकाळी गावातील नागरिक तसेच शेती व्यवसाय बागायतदारांनी वृक्षरोपण कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी नदीकिनारी झाडे लावण्यात आली. शेतकरी उदय महाले म्हणाले की आम्ही गेली अनेक वर्षे सरकारदरबारी बेकायदेशीर रेती उत्खनन बंद व्हावे यासाठी संघर्ष करत आहोत. अनेकवेळा पत्रव्यवहार केला. पण काही उपयोग नाही. मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरूच आहे. नदी वाचवण्यासाठी आणि जमिनीचे संवर्धन करण्यासाठी ही मोहीम राबवली आहे,

गेल्या वीस वर्षांहून अघिक काळ या भागात बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू आहे. पूर्वी या नदीचे पात्र सुमारे 30 ते 35 मीटर होते.दोन्ही बाजूने 30 ते 40 मीटर जमीन नदीने गिळंकृत केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे मळे या नदीत समाविष्ट झाले आहेत. अनेक झाडे तसेच लहान कवाथे नदीच्या पात्रात गेलेले आहेत. वेळोवेळी विनंतीपत्र पाठवूनही सरकार कुठल्याच प्रकारे यावर निर्बंध घालत नसल्याने अखेर या भागातील ग्रामस्थांनी आज खारफुटी झाडांची लागवड करून नदीसंवर्धनासाठी पाऊल उचलले.

- शशिकांत महाले , माजी सरपंच, तांबसे मोप

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT