Calangute locals protests against Illeagal Massage Parlor Dainik Gomantak
गोवा

Calangute News: ग्रामस्थांच्या आंदोलनाचा दणका! कळंगुट येथील बेकायदा मसाज पार्लरना ठोकले टाळे

पंचायत मंडळाची कारवाई; ग्रामस्थांच्या एकजुटीला यश

गोमंतक ऑनलाईन टीम

Calangute Illeagal Massage Parlor: कळंगुट येथील नाईकवाडा येथे बेकायदा कार्यरत असलेले मसाज पार्लर्स कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आज, सोमवारी ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांच्या या आंदोलनानंतर पंचायत मंडळाने बेकायदा मसाज पार्लरला टाळे ठोकले.

कळंगुट परिसरात अनेक बेकायदा मसाज पार्लर सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्या विरोधात कारवाई करावी, यासाठी वारंवार विनंत्या करण्यात आल्या आहेत. तथापि, या पार्लरशी असलेल्या आर्थिक हितसंबंधांतून त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. अशा मसाज पार्लरच्या आडून अवैध धंदे केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सोमवारी, 17 जुलै रोजी अनेक ग्रामस्थ, महिला बेकायदा मसाज पार्लरवर कारवाई करावी, यासाठी पंचायत कार्यालयासमोर जमले. त्यांनी तिथे घोषणाबाजी करत हे बेकायदा पार्लर तत्काळ बंद करण्याची मागणी केली.

कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थ, महिलांनी म्हटले होते. या आंदोलनाची दखल घेत कळंगुट पंचायत मंडळानेही त्वरीत कारवाई करत बेकायदा मसाज पार्लरना टाळे ठोकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT