Mapusa News Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: महामार्ग बनलाय डंपिंग ग्राउंड! टाकाऊ साहित्य टाकताना दोन ट्रक जप्त

भराव टाकताना पकडले रंगेहाथ ः म्हापशात टाकाऊ बांधकाम साहित्याचे दोन ट्रक जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News म्हापसा येथील राष्ट्रीय महामार्गशेजारी मातीचा भराव (डेब्रिज) टाकणारे दोन ट्रक बुधवारी दुपारी बार्देश मामलेदार यांनी रंगेहाथ पकडले व पोलिसांनी ते जप्त केले.

बार्देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला राडारोडा व मातीचा भराव टाकून जमीन बुजवण्याचे प्रकार सुरू आहेत. या बेकायदा प्रकारांवर आम्ही वेळोवेळी कारवाई करत असून लोकांनीही दक्षता बाळगून अशा घडणाऱ्या प्रकारांची माहिती आम्हाला द्यावी, असे आवाहन बार्देशचे मामलेदार प्रवीण गावस यांनी केले.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी (ता.२४) दुपारी बार्देशचे मामलेदार प्रवीण गावस यांनी अव्वल कारकून शैलेश कोठावळे तसेच कर्मचारी जयेश कामत यांच्यासह ग्रीनपार्क ते तार जंक्शनच्या दरम्यान सर्व्हिस रोडच्या बाजूला बेकायदा टाकाऊ बांधकाम साहित्याचा भराव टाकणाऱ्या एका ट्रकला रंगेहाथ पकडले व त्यानंतर टाकाऊ साहित्य घेऊन आलेल्या अजून एका ट्रकला पकडले.

बेती व सुकूर येथील कंत्राटदार कंपनीकडून हे टाकाऊ बांधकाम साहित्य महामार्गानजिक आणून टाकले जात होते. या ठिकाणी शंभर मीटरच्या परिसरात हा भराव टाकल्याचे मामलेदारांना दिसून आले.

या प्रकाराबाबत मामलेदारांनी ट्रक चालक व कंत्राटदारांना जाब विचारला. पण आम्ही नियमांनुसार या ठिकाणी हे साहित्य टाकत असल्याचा दावा कंत्राटदाराने करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या संबंधित परवानगीपत्र सादर करण्यास कंत्राटदार अपयशी ठरले.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरणाचे बांधकाम सुरू असताना जून २०१८मध्ये तत्कालिन उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी करासवाडा ते गिरी दरम्यानच्या क्षेत्रात बांधकामाचे टाकाऊ साहित्य व मातीचा भराव टाकण्याची मुभा दिली होती.

यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंत्यांकडून रितसर परवानगी घेणे, पोलिसांना कल्पना देणे व इतर नियम लागू केले होते.

पण, महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही साबांखाच्या अधिकाऱ्यांनी वरील आदेशाचा आधार घेऊन महामार्गानजिक टाकाऊ साहित्य व मातीचा भराव टाकण्याची मुभा कंत्राटदारांना दिली आहे.

नवीन परवानगी न देता 2019 मध्ये घेतलेल्या परवान्यानुसारच हा बेकायदा प्रकार करण्यास सांबाखाच्या अधिकारी लोकांना प्रोत्साहन देत असल्याचे उघडकीस आले आहे.

दहा हजारांचा दंड; चालक परवाना निलंबित

मामलेदार प्रवीण गावस यांनी म्हापसा पोलिस व वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. वाहतूक खात्याचे निरीक्षक अभय शिरवईकर यांनी या ट्रक चालकांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावला.

आणि वाहन चालकांचा सहा महिन्यांसाठी वाहन चालक परवाना निलंबित केला. तर पोलिस हवालदार तुकाराम शिरोडकर यांनी हे दोन्ही ट्रक जप्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT