ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation : ‘एसटी’ आरक्षण सरकारने भूमिका स्‍पष्‍ट करावी

ST Reservation : मिशन पॉलिटिकल’कडून सरदेसाईंना निवेदन

गोमन्तक डिजिटल टीम

ST Reservation : मडगाव, गोव्‍यातील एसटी बांधवांना २०२७ च्‍या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळेल की नाही, यासंदर्भातील सरकारने आपली भूमिका या लाेकसभा निवडणुकीच्‍या पूर्वी स्‍पष्‍ट करण्‍याची गरज विजय सरदेसाई यांनी गुरुवारी (ता.१) व्‍यक्‍त केली.

मतदारसंघाची फेररचना केल्‍यावर आरक्षणाचा निर्णय घेणार ही जर सरकारची भूमिका असेल तर येत्‍या विधानसभा निवडणुकीत गोव्‍यातील एसटी बांधवांना आरक्षण मिळणे कठीण आहे, असे मतही त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

गुरुवारी मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन या संघटनेच्‍या शिष्‍टमंडळाने विजय सरदेसाई यांची ‘गोंयकार घर’मध्‍ये भेट घेतली आणि राजकीय आरक्षणाप्रीत्‍यर्थ ५ फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेवर एसटी बांधवांतर्फे मोर्चा नेण्‍यात येणार आहे त्‍याला सरदेसाई यांनी पाठिंबा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्‍यात आली.

ही मागणी धसास लावण्‍यासाठी केंद्र सरकारकडे एक सर्वपक्षीय शिष्‍टमंडळ नेण्‍यात यावे, अशीही मागणी यावेळी या शिष्‍टमंडळाने केली. या शिष्‍टमंडळात जोजफ वाझ, रवींद्र वेळीप तसेच अन्‍य पदाधिकारी उपस्‍थित होते.

गाेव्‍यात आणि केंद्रात दोन्‍हीकडे भाजपचे सरकार आहे, त्‍यामुळे केंद्रात सर्वपक्षीय शिष्‍टमंडळ नेण्‍याची गरजच नाही.

जर गाेव्‍यातील भाजप सरकारला ही मागणी पूर्ण करायची असेल, तर त्‍यांना केंद्र सरकारशी संपर्क साधून ही मागणी मान्‍य करणे सहज शक्‍य आहे. मात्र, या सरकारला तसे करायचे नाही, असे वाटते. भाजपात जे एसटी आमदार आहेत ते यासंदर्भात का आवाज उठवत नाहीत.

- विजय सरदेसाई, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT