Goa Politics: दीपाली सावळ यांचा मडगाव उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा

Goa Politics: आमदारांकडे सोपवले पत्र: बबिता यांची वर्णी शक्य
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: मला उपनगराध्‍यक्ष पदावर मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी बसविले होते. त्यामुळे माझ्या राजीनाम्याचे पत्रही मी त्यांच्याकडेच दिले आहे. तेच आमचे नेते आहेत. माझ्या राजीनाम्याबद्दलचा शेवटचा निर्णयही तेच घेतील, अशी प्रतिक्रिया मडगावच्या उपनगराध्‍यक्षा दीपाली सावळ यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या नव्या घडामोडीनंतर मडगाव पालिकेतील सत्तानाट्याला पुन्हा गती आली असून फातोर्डा भागातील ज्येष्ठ नगरसेविका बबिता नाईक यांचे नाव उपनगराध्‍यक्षपदाच्या उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे.

तीन वर्षांपूर्वी विजय सरदेसाई आणि दिगंबर कामत यांनी एकत्र येऊन मडगाव पालिकेत नगरमंडळ स्थापन केले होते. त्यावेळी दर दीड वर्षाने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बदलण्याचा फॉर्म्युला ठरला होता.

Goa Politics
Illegal Construction: हरमल सरपंचांवर संक्रांत !

मडगाव आणि फातोर्डा या भागातील नगरसेवकांना आळीपाळीने ही पदे वाटून देण्याचा निर्णय झाला होता. सावळ यांनी काल पदाचा राजीनामा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्‍याकडे सुपूर्द केला.

सावळ यांची या पदावर दीड वर्षांसाठीच नियुक्ती झाली होती. पण तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ हे पद उपभोगले. त्यामुळे त्यांनी पायउतार व्हावे, अशी सत्तागटाची मागणी होती.

Goa Politics
MLA Vijay Sardesai: गोव्‍यात रामराज्‍यच नाही; गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com