Goan Cashew GI Tag Dainik Gomantak
गोवा

Goan Cashew GI Tag: गोवन काजूला मिळाला अधिकृत GI टॅग, CM सावंत म्हणाले स्वयंपूर्ण गोव्यासाठी मैलाचा दगड

Pramod Yadav

Goan Kaju GI Tag: गोव्याच्या काजूला (कर्नल) अधिकृतपणे जिओग्राफिकल इंडिकेशन (GI) टॅग मिळाला आहे. काजू GI टॅग विरोधात कोणताही हरकत अर्ज दाखल झाला नाही, त्यामुळे काजूची GI टॅग नोंदणी आता अधिकृतपणे नोंदणीकृत मानली जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अधिकृत नोंदणी अद्यावत होणे अपेक्षित आहे.

"गोवन काजू दीर्घकाळ जपलेला वारसा आहे आणि GI टॅग हा वारसा जपण्यास मदत करेल. तसेच, यामुळे काजू उद्योगातील प्रत्येकला उत्तम संधी मिळेल, स्वयंपूर्ण गोवा मिशनसाठी हा एक मैलाचा दगड आहे," असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

खाजू खरेदीदारांना अस्सल गोव्यातील काजू आणि इतर प्रदेशांतून आलेले काजू यांच्यातील फरक ओळखण्यास GI टॅग मदत करेल, असेही सावंत म्हणाले.

गोव्यातील काजूची मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादकांनी बऱ्याचवेळा आफ्रिकन काजू आयात केले आहेत. GI टॅगमुळे ग्राहकांना खरेदी करत असलेल्या काजूचे मूळ निश्चित करता येणार आहे.

GI टॅगमुळे स्थानिक काजू उत्पादकांना संरक्षण आणि खात्री मिळण्यासह उद्योगाला चालना मिळेल असे, गोवा काजू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष रोहित झांट्ये म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: अमित पाटकर इफेक्‍ट?

Goa Accidents: 'गोव्यातील भाजप सरकारने चतुर्थी उत्सवात अंधार पसरवला'; अपघातांवरून पाटकर यांचा घणाघात

Old Goa Church: ओल्ड गोव्याची चर्च उद्या पर्यटकांसाठी बंद!!

Curchorem Roads: जलवाहिनीसाठी पुन्हा रस्ते खोदणार! कुडचडेत होणार रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती

'गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे'; गुजरातमधील परिषदेत मुख्‍यमंत्री सावंतांचे आवाहन

SCROLL FOR NEXT