Devidas Chandrakant Konadkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: पेडण्यात टॅक्सीचालकांनी आणले कोनाडकरांचे खून प्रकरण उघडकीस

Goa Crime: धारगळ येथे टॅक्सीचालक देविदास चंद्रकांत कोनाडकर (वय ५५ वर्षे, दाडाचीवाडी-धारगळ) यांचा उजवीकडील कान मारेकऱ्यांनी कापला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News: धारगळ येथे टॅक्सीचालक देविदास चंद्रकांत कोनाडकर (वय ५५ वर्षे, दाडाचीवाडी-धारगळ) यांचा उजवीकडील कान मारेकऱ्यांनी कापला. लोखंडी वस्तूने डोके ठेचले. त्यामुळेच अपघात नव्हे, तर हा खुनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी टॅक्सीचालकांनी पुढाकार घेऊन स्वतःच तपासकाम आरंभल्याने संशयितांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणातील तीनपैकी दोन संशयितांना टॅक्सीचालकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. नंतर एकाला पोलिसांनी पकडले होते. मंगळवारी सायंकाळी उशिरा चौथा संशयितही पोलिसांच्या हाती लागला.

सर्व संशयित उत्तर प्रदेशचे

याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये मालवाहू रिक्षाचालक मोहितकुमार प्रेमपाल सिंग (वय १९ वर्षे) आणि अभिषेककुमार राजकुमार सिंग हे दोघे बुलंद शहर, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील आहेत. देविदास कोनाडकर यांनी थप्पड लगावल्याचा राग आल्यामुळेच सुडाच्या भावनेने मालवाहू रिक्षाने पाठलाग करून त्यांच्या स्कूटरला ठोकरल्याचे आरोपींनी पोलिस तपासावेळी मान्य केले.

पलायनाचा बेत फसला

या प्रकरणातील संशयितांना टॅक्सीचालकांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिस पोचेपर्यंत तिघापैकी एक संशयित जंगलाच्या दिशेने सायंकाळी साहेसहाच्या सुमारास पळाला. त्याच्या मागे टॅक्सीचालक धावले; मात्र तो सापडू शकला नाही. पळून जाताना वारखंड वाचनालयाच्या सीसीटीव्हीमध्ये तो कैद झाल्याने आज नागझर येथे त्याला पोलिसांनी पकडले. त्यानंतर चौथा संशयित स्थानिकांना सापडला असून त्यालाही पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

अपघात हेतूपुरस्सर : कौशल

कोनाडकरांचा अपघात ही ‘हिट ॲण्ड रन’ची घटना नसून तो हेतूपुरस्सर केलेला अपघात असल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिकांनी रिक्षा आणि संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. या प्रकरणातील संशयितांना आम्ही अटक केली आहे. तपासादरम्यान समजले की, हा अपघात कोनाडकर आणि रिक्षाचालक यांच्यात झालेल्या भांडणानंतर त्याने रिक्षा धोकादायक स्थितीत रस्त्याच्या कडेला उभी केली होती.

दोन तास पोलिस फिरकलेच नाहीत

कोनाडकर रस्त्यालगत पडल्याचे रविवारी रात्री एका टॅक्सीवाल्याने पाहिले. त्याने ती माहिती टॅक्सीवाल्यांच्या व्हॉटस ॲप ग्रुपवर दिली. आनंद गावस, अभिषेक तोरस्कर, रामा वारंग, साहील मळीक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

टॅक्सीवाल्यांनी खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. पोलिस दोन तास तेथे न फिरकल्याने संतप्त टॅक्सीचालकांनी रविवारी रात्री दोन तास मोपा विमानतळावरील वाहतूक बंद पाडली. त्यानंतर पोलिस आले आणि मृतदेह इस्पितळात हलविला.

कानशिलात मारले, म्हणून चिरडले

ही घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली. कोनाडकर स्कूटरवरून (जीए-११-एफ-३३६८) घरी चालले होते. त्यावेळी रस्त्यावर वेडीवाकडी चालणारी मालवाहू रिक्षा (जीए-०३-एन-३६६२) त्यांना आढळली. बाजू न देण्याच्या रागातून त्यांनी रिक्षा थांबवली आणि रिक्षातील लोकांना जाब विचारला. यावेळी झालेल्या झटापटीत कोनाडकर यांनी कानशिलात ठेवून दिल्याने रिक्षातील तिघेजण चिडले.

त्यांनी पुढे जाऊन रिक्षा कोनाडकर यांच्या स्कूटरवर घातली. कोनाडकर पडल्यावर त्यांच्या डोक्यावर त्यांनी वार केले आणि कान कापला, असे दिसते. कोनाडकर यांचा मृतदेह रविवारी इस्पितळात नेला, तेव्हा त्याला कान नव्हता आणि डोक्यावर माराच्‍या खुणा होत्या, असे प्रत्यक्षदर्शी निखिल महाले यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. तो तुटलेला कान आज पोलिसांना सापडला.

सीसीटीव्ही फुटेज प्राप्त

पोलिसांनी या प्रकरणातील रिक्षा जप्त केली असून चालक आणि सोबतच्या अन्य व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. आम्हाला या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहेत. या प्रकरणात तीन लोक गुंतले असून एकजण फरार आहे. सर्व संशयित उत्तर प्रदेशातील असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती कौशल यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT